दि्वतीय वर्ष अभियांत्रिकीच्या १० टक्के जागांमध्ये घट; अकरावी सायन्सकडे वाढणार विद्यार्थ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 05:35 PM2019-03-05T17:35:05+5:302019-03-05T17:37:18+5:30

अभियांत्रिकी प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून,  नवीन नियमानुसार तंत्रशिक्षण पदवीकेनंतर थेट अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्ष प्रवेशाच्या जागांमध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यापूर्वी अभियांत्रिकीच्या एकूण जागांच्या २० टक्के जागांवर थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिला जात होता. परंतु आता जागांमध्ये कपात केल्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासोबतच विज्ञान शाखेच्या अकरावी प्रवेशावरही याचा परिणाम होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांचा डिप्लोमाऐवजी विज्ञान शाखेच्या अकरावीला प्रवेश घेण्याकडे कल वाढण्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रातून वतर्विली जात आहे. 

Decrease in 10 percent of engineering in the second year; Students will be moving towards eleven science | दि्वतीय वर्ष अभियांत्रिकीच्या १० टक्के जागांमध्ये घट; अकरावी सायन्सकडे वाढणार विद्यार्थ्यांचा कल

दि्वतीय वर्ष अभियांत्रिकीच्या १० टक्के जागांमध्ये घट; अकरावी सायन्सकडे वाढणार विद्यार्थ्यांचा कल

Next
ठळक मुद्देअभियांत्रिकी थेट द्वीतीय वर्ष प्रवेशराखीव जागांमध्ये 10 टक्के कपात विद्यार्थ्यांचा अकरावीकडे वाढण्याची शक्यता


नाशिक : अभियांत्रिकी प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून,  नवीन नियमानुसार तंत्रशिक्षण पदवीकेनंतर थेट अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्ष प्रवेशाच्या जागांमध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यापूर्वी अभियांत्रिकीच्या एकूण जागांच्या २० टक्के जागांवर थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिला जात होता. परंतु आता जागांमध्ये कपात केल्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासोबतच विज्ञान शाखेच्या अकरावी प्रवेशावरही याचा परिणाम होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांचा डिप्लोमाऐवजी विज्ञान शाखेच्या अकरावीला प्रवेश घेण्याकडे कल वाढण्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रातून वतर्विली जात आहे. 
अभियांत्रिकी अभ्यासक्रमात पदविका पूर्ण केल्यानंतर पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागांमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) १० टक्के कपात केली आहे. अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमाना प्रवेश घेण्यासाठी  बारावीनंतर थेट पदवी प्रवेशाचा पर्याय असून दहावीनंतर तंत्रशिक्षण पदविकेनंतर अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेता येतो. पदविका अभ्यासक्रमानंतर अभियांत्रिकी प्रवेशसाठी यापूर्वी २० टक्के राखीव जागा होत्या. परंतु, एआयसीटीईने नव्याने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी राखीव जागांचे प्रमाण १० टक्के कमी केले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाच्या जागा जवळपास निम्म्याने कमी होणार  आहे. त्यामुळे सध्या पदविके चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीचा प्रवेश घेताना पसंतीचे महाविद्यालय मिळविण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता असल्याने या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करून नये, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.
कोट-
एआयसीटीईच्या निर्णयामुळे सध्या तंत्रशिक्षण पदविका घेणाºया विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी मिळविण्यासाठी जवळपास निम्म्या जागा कमी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून, त्यांना चांगले गुण असूनही अपेक्षित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे अवघड होणार आहे. माझ्या मुलाला ९२ टक्के गुण असूनही आम्हाला त्याच्या प्रवेशाची काळजी लागली आहे. - अशोक हुंडेकरी, पालक  

Web Title: Decrease in 10 percent of engineering in the second year; Students will be moving towards eleven science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.