उत्तर महाराष्ट्रात कोरोना बाधीतांच्या मृत्यू दरात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 11:40 PM2020-10-04T23:40:13+5:302020-10-05T01:25:27+5:30
नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्'ात गत आठवड्याच्या तुलनेत यंदा रूग्णांची संख्या वाढली असली तरी एकुण रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात आणि मृत्यू ...
नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्'ात गत आठवड्याच्या तुलनेत यंदा रूग्णांची संख्या वाढली असली तरी एकुण रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात आणि मृत्यू दरात घट झाली आहे. गेल्या आठवड्यात बरे होण्याचे प्रमाण ८५.९४ टक्के होते. ते आता ८८.१ टक्के इतके झाले आहेत. तर गेल्या आठवड्यात मृत्यू दर २.०२ टक्के इतका होता. तो आता १.९९ टक्के इतका झाला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक , अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्'ात गेल्या आठवड्यात १ लाख ७७ हजार ३५१ रूग्ण होते. यात आठवडभरात वाढ झाली आहे. रविवारपर्यंत ही संख्या एक लाख ९३ हजार पर्यंत पोहोचली आहे. त्यातील १ लाख ६९ हजार १५३ रुग्ण उपचार केल्याने बरे झाले आहेत.
कोरोना रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ८८.०१ टक्के इतके आहे. तर करोनामुळे आतापर्यंत विभागात ३८१७ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर १.९९ टक्के आहे. उत्तर महाराष्ट्राच्या पाच जिल्'ात गेल्या २४ तासात विभागात १९५० नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर उपचाराअंती १८३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर चोविस तासातच ५३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रात पाच लाख ७७ हजार ५३८ रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यातील ३३.२७ टक्के रूग्ण पॉझीटीव्ह आले तर तीन लाख ८१ हजार ७१३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. अजुनही दोन हजार नमुन्यांचे अहवाल सध्या प्रलंबित आहेत. सध्या विभागात १९ हजार २१९ रुग्ण उपचार घेत आहेत.
उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे ७९ हजार २८० रुग्ण नाशिक जिल्'ाात आढळले आहेत. मात्र, यातील ६८ हजार ४०९ रुग्ण उपचाराअंती करोनामुक्त झाले. तर १४२७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या नऊ हजार ४४४ रुग्ण नाशिक जिल्'ात उपचार घेत आहेत. जळगाव जिल्'ाात कोरोना बाधीतांची संख्या ५० हजाराच्या टप्पात आहे. त्यापैकी ४३ हजार १४८ रुग्ण बरे झाले. तर ११९८ जणांचा मृत्यू झाला. या जिल्'ात सध्या चार हजार ७६० रुग्ण उपचार घेत आहेत.
अहमदनगर जिल्'ाात कोरोनाचा प्रसार वाढत असून आतापर्यंत ४५ हजार ६१७ रुग्ण आढळले. त्यातील ४१ हजार ३६९ रुग्ण बरे झाले. तर ७०३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ३५४५ रुग्ण उपचार घेत आहेत. धुळे जिल्'ाात करोनाबाधितांची संख्या १२ हजार पाचशेवर गेली आहे.
त्यातील ११ हजार ४७६ रुग्ण बरे झाले आहेत तर ३६५ रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या धुळे येथे ६६९ रुग्ण उपचार घेत आहेत. नंदुरबार जिल्'ात आतापर्यंत ५ हजार ६७६ रुग्ण आढळले. त्यातील ४ हजार ७५१ रुग्ण बरे झाले तर १२४ जणांचा मृत्यू झाला. सध्या ८०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
घरीच उपचारांना प्राधान्य
गेल्या काही दिवसात कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी शासकिय रूग्णालये आणि खासगी रूग्णालयांची संख्या वाढत असली तरी घरी राहून उपचार घेणा-यांची संख्या वाढु लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या २५ हजार ७०३ रूग्ण हे गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.