वीजनिर्मितीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:16 PM2020-03-26T23:16:40+5:302020-03-26T23:17:29+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाउन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवावगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत अभूतपूर्व घट झाली आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढून २० हजार मेगावॉटपर्यंत जाते, मात्र सध्या विजेची मागणी १३ हजार मेगावॉटपर्यंत आलेली आहे. ती अजूनही घटण्याची शक्यता आहे. अर्थात, लॉकडाउनमुळे उद्योग व्यवसाय तर बंद झालेच; परंतु राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांत अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाल्यानेदेखील घरगुती विजेची मागणीही कमी झाली आहे.

Decrease in electricity generation | वीजनिर्मितीत घट

वीजनिर्मितीत घट

Next
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : लॉकडाउनबरोबरच अवकाळी पावसाचाही परिणाम

शरदचंद्र खैरनार।
एकलहरे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाउन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवावगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत अभूतपूर्व घट झाली आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढून २० हजार मेगावॉटपर्यंत जाते, मात्र सध्या विजेची मागणी १३ हजार मेगावॉटपर्यंत आलेली आहे. ती अजूनही घटण्याची शक्यता आहे. अर्थात, लॉकडाउनमुळे उद्योग व्यवसाय तर बंद झालेच; परंतु राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांत अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाल्यानेदेखील घरगुती विजेची मागणीही कमी झाली आहे.
सद्यस्थितीत महानिर्मितीचे नाशिक, परळी, भुसावळ व खापरखेडा येथील २१० मेगावॉटचे संच विजेच्या मागणीअभावी बंद ठेवण्यात आले आहेत. इतर ठिकाणची वीज निर्मिती कमी- अधिक प्रमाणात सुरू आहे. एकलहरे येथील प्रत्येकी २१० मेगावॉटच्या तीन संचांपैकी एकाचा कोळसा खासगी कंपनीस दिला आहे. एक संच स्टँडबाय असून, एका संचातून १५० मेगावॉटच्या जवळपास वीज उत्पादन दोन दिवसांपूर्वी सुरू होते. मात्र महावितरणची मागणी घटल्याने तो संचही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागणी वाढल्यावर संच त्वरित सुरू करण्यात येईल, असे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी लोकमतला सांगितले.
गरज भासलीच तर हा तुटवडा केंद्र शासनाच्या वाट्यातून म्हणजेच सेंटर ग्रीडमधून मिळणाऱ्या विजेतून भागवलो जातो, परंत तूर्तास विजेची मागणी घटली आहे.

राज्याची मागणी १५ हजार ७४३ मेगावॉट
दिनांक २६ मार्चच्या सायंकाळी ५ वाजेच्या आकडेवारीनुसार कोल, गॅस, हायड्रो व सोलर मिळून महाजेनकोची वीजनिर्मिती ५ हजार ४२३ मेगावॉट आहे. तर खासगी क्षेत्रातील विविध कंपन्यांची तसेच इतरांची एकूण ४ हजार १३३ मेगावॉट वीजनिर्मिती अशी एकूण (मुंबईवगळता) ९ हजार ५५६ मेगावॉट वीज राज्यात उपलब्ध होत आहे. महानिर्मितीसह खासगी व इतर स्रोतांची मिळून १० हजार ७२६ मेगावॉट वीज आहे. त्या तुलनेत राज्याची मागणी १५ हजार ७४३ मेगावॉट आहे. राज्याची मागणी लक्षात घेता सुमारे पाच हजार मेगावॉट विजेचा तुटवडा भासतो.

वीजनिर्मितीची स्थिती
एकलहरे (नाशिक)- क्षमता ६३० मेगावॉट, वीजनिर्मिती- शून्य
कोराडी- क्षमता २४०० मेगावॉट, वीजनिर्मिती- १२७२
खापरखेडा- क्षमता १३४० मेगावॉट, निर्मिती ४७६,
पारस- क्षमता ५०० मेगावॉट, निर्मिती- ४६१,
परळी- क्षमता ११७० मेगावॉट, निर्मिती- शून्य,
चंद्रपूर- क्षमता २९२० मेगावॉट, निर्मिती- १६००,
भुसावळ- क्षमता १२१९ मेगावॉट, निर्मिती- शून्य,
उरण गॅस टर्बाईन- क्षमता ४३२ मेगावॉॅट, निर्मिती- २५५

Web Title: Decrease in electricity generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.