पावसाने ओढ दिल्याने भाताच्या उत्पन्नात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 03:14 PM2018-10-24T15:14:43+5:302018-10-24T15:14:53+5:30

घोटी : आरंभीच्या काळात समाधानकारक झालेल्या पावसाने मात्र ऐन धान्यावर पीक आलेले असताना दडी मारल्याने गरी जातीचे भात जळण्याच्या मार्गावर आहे.दरम्यान कमी पावसात उत्पन्न येणा्या हळी जातीचे भात कापणीच्या कामाला वेग आला असून या भाताला बाजारपेठेत मातीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.

 Decrease in the income of the rice due to monsoon rains | पावसाने ओढ दिल्याने भाताच्या उत्पन्नात घट

पावसाने ओढ दिल्याने भाताच्या उत्पन्नात घट

googlenewsNext
ठळक मुद्देसाधारणत: तीन महिन्यात हे पीक येते तसेच या पिकाला पाण्याची अधिक गरज असते.मात्र पावसाच्या भरवशावर लावलेल्या या भाताला पावसाने दगा दिल्याने ही पिके वाचविण्यासाठी शेतकº्यांची केविलवाणी धडपड तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.



घोटी : आरंभीच्या काळात समाधानकारक झालेल्या पावसाने मात्र ऐन धान्यावर पीक आलेले असताना दडी मारल्याने गरी जातीचे भात जळण्याच्या मार्गावर आहे.दरम्यान कमी पावसात उत्पन्न येणा्या हळी जातीचे भात कापणीच्या कामाला वेग आला असून या भाताला बाजारपेठेत मातीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.
पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाº्या इगतपुरी तालुक्याच्या काही भागात आरंभीच्या काळात समाधानकारक पाऊस झाला या पावसामुळे तालुक्याच्या धरणसाठ्यात अल्पावधीतच लक्षणीय वाढ होऊन धरणे भरली मात्र नंतरच्या काळात पावसाने सातत्याने ओढ दिली.यामुळे ऐन पिकावर पावसाची गरज असताना पावसाने ओढ दिल्याने उन्हाच्या तिव्रतेमुळे हातातोंडाशी आलेले भाताचे पीक शेतकº्यांच्या डोळ्यादेखत जळून जात आहे.दरम्यान पावसाने ओढ दिल्याने भाताच्या उत्पन्नांत प्रचंड घट झाल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.यामुळे तालुक्यातील शेतकरी दिवाळी पूर्वीच आर्थिक संकटात सापडला आहे.

पिके वाचिवण्यासाठी केविलवाणी धडपड
दरम्यान तालुक्यात सर्वाधिक गरी जातीचे भाताची लागवड केली जाते.हे पीक उत्पनास अधिक असल्याने ही पिके घेण्याकडे शेतकऱ्याचा कल अधिक आहे.या पिकांना जगविण्यासाठी शेतकºयांच्या सर्व कुटुंबाला रात्रीचा दिवस करून जवळच्या नदी,नाले,बंधारा,धरण आणि विहिरीतून पाणी दयावे लागत आहे.

पावसाच्या आकडेवारीत फरक
दरम्यान इगतपुरी तालुक्यात सहा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र असल्याने सहा ही ठिकाणी पावसाच्या आकडेवारीत तफावत असते.तालुक्याच्या घाट माथ्यावर असणाº्या इगतपुरी शहर परिसरात सर्वाधिक पाऊस पडतो तर पूर्व भागात पावसाची आकडेवारी निम्म्याहून कमी असते.असे असताना शहरातील आकडेवारी शासन गेली अनेक वर्षांपासून गृहीत धरीत असल्याने तालुक्यात दुष्काळ जाहीर होत नसे.यावर्षीपासून पावसाची सरासरी काढल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.

पंचनामे करण्याची मागणी
दरम्यान तालुक्यात शेवटच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने भात पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याने शासनाने या पिकाचे तात्काळ पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकº्यांना भरपाई दयावी अशी मागणी तालुक्यातील शेतकº्यांनी केली आहे.

Web Title:  Decrease in the income of the rice due to monsoon rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.