रूग्ण संख्येबरोबरच मृत्यूच्या प्रमाणात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:08 PM2020-09-30T23:08:22+5:302020-10-01T01:47:13+5:30
नाशिक- कोरोना चाचण्यांचे प्रमाण कायम असले तरी गेल्या चार ते पाच दिवसात बाधीतांचे प्रमाण कमी होत आहे गेल्या चोवीस तासात शहरात ७३८ रूग्ण आढळले तरी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर उपचाराधीन रूग्णांची संख्या साडे तीन हजारावर आली आहे.

नाशिक शहरात दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. मात्र, गेल्या काही दिवसात रूग्णांचे प्रमाण कमी होत चालले आहे. गेल्या चोवीस तासात ७३८ रूग्ण आढळले आहेत. तर पाच जणांचा कोरोनामुळे
मृत्यू झाला आहे. दररोज सरासरी दहा ते पंधरा जणांचा मृत्यू झाला असताना आता मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. चोवीस तासात पाच जणांचा मृत्यू झाला असून यात सातपूर येथील ४२ वर्षीय रूग्ण, नाशिकरोड येथील ८२ वर्षीय
वृध्द, जेलरोड येथील ६५ वर्षीय वृध्द, पंचवटीत रामवाडी येथे ६४ वर्षीय वृध्द, हॅपी होम कॉलनी येथील ६४ वर्षीय रूग्ण्