नवीन रुग्णसंख्येत घट, मात्र बळी ४१ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:43+5:302021-06-04T04:12:43+5:30
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ०३) नवीन ५२३ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण ९७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांच्या तुलनेत ...
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ०३) नवीन ५२३ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण ९७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पटच्या जवळ असली तरी जिल्ह्यात ४१ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४,८३०वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या अधिक असली तरी बळींची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळेच गुरुवारी एकूण उपचारार्थी रुग्णांच्या संख्येत अजून घट होऊन ही संख्या ७५९१ पर्यंत खाली घसरली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १७०, तर नाशिक ग्रामीणला ३३९ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ११, तर जिल्हाबाह्य ०३ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १४, ग्रामीणला २७ असा एकूण ४१ जणांचा बळी गेला आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या घटत असली तरी प्रदीर्घ काळापासून उपचार घेऊनही बरे न झालेले रुग्ण दगावत असल्यानेच बळींची संख्या चाळीसहून अधिक राहत असल्याचे दिसून येत आहे.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ९७ टक्क्यांनजीक
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९६.७९ टक्क्यावर पाेहाेचले आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९७.५५ टक्के, नाशिक शहर ९७.५७, नाशिक ग्रामीण ९५.६५, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ९५.९१ टक्क्यांवर पाेहोचला आहे.