मेरी कोविड सेंटरच्या रुग्ण संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:14 AM2021-05-26T04:14:30+5:302021-05-26T04:14:30+5:30
गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या लाटेत रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी मेरी येथील पंजाबराव देशमुख वसतिगृहात कोविड सेंटर सुरू केले होते. ...
गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या लाटेत रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी मेरी येथील पंजाबराव देशमुख वसतिगृहात कोविड सेंटर सुरू केले होते. त्यावेळी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. लाट ओसरल्यावर सदर कोविड सेंटर बंद करण्यात आले. मात्र, चालू वर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा दुसरी लाट आल्याने रुग्ण संख्येत हळूहळू वाढ होऊ लागल्याने प्रशासनाने बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू केले. १८० बेड व्यवस्था असलेल्या सेंटरमध्ये दुसऱ्या लाटेत उपचार घेण्यासाठी दाखल रुग्णांची संख्या ९०वर गेली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्ण कमी होत असल्याने बेड रिकामे झाले आहेत. सध्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५४वर आलेली आहे. दुसरी लाट सुरू झाली, त्यानंतर दैनंदिन अँटिजन, आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात होत्या. दिवसाला ३०० अँटिजन, तर ४०० रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जायची. आता रुग्ण संख्या कमी झाल्याने दिवसभरात अँटिजन आणि आरटीपीसीआर मिळून केवळ २०० चाचण्या होत आहेत.