निफाड तालुक्यातील रुग्ण संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 00:44 IST2021-05-04T22:22:07+5:302021-05-05T00:44:41+5:30
लासलगाव : निफाड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना होत असल्याने मंगळवारी पॉझीटीव्ह रूग्णाची संख्या कमी झाली आहे. मागील काही आठवड्यापासुन दररोज ३०० च्या आसपास येणारी कोरोना रुग्ण संख्या आज दिवसभरात १८५ होती.

निफाड तालुक्यातील रुग्ण संख्येत घट
ठळक मुद्देआजपर्यंत एकूण बरे झालेल्या रूग्णांची संख्या १३३५४
लासलगाव : निफाड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना होत असल्याने मंगळवारी पॉझीटीव्ह रूग्णाची संख्या कमी झाली आहे. मागील काही आठवड्यापासुन दररोज ३०० च्या आसपास येणारी कोरोना रुग्ण संख्या आज दिवसभरात १८५ होती.
निफाड तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या १५६७९ असुन आजपर्यंत एकूण बरे झालेल्या रूग्णांची संख्या १३३५४ असल्याने आता रूग्ण बरे होण्याचे शेकडा प्रमाणही वाढले असुन हे प्रमारण ८५.१७ टक्के आहे.
निफाड तालुक्यातील आत्तापर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू ४८६ झाले असुन मृत्यू दर ३.१० टक्के आहे.