बाधितांच्या संख्येत घट : बळींनी गाठला चार हजारांचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 01:49 AM2021-05-14T01:49:01+5:302021-05-14T01:50:27+5:30
जिल्ह्यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. गुरूवारी (दि.१३) तब्बल साडे सात हजार रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र ३४ जणांचा मृत्यू झाल्याने वर्षापासून आत्तापर्यंतच्या बळींच्या संख्येने चार हजाराचा टप्पा पार केला आहे.
नाशिक : जिल्ह्यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. गुरूवारी (दि.१३) तब्बल साडे सात हजार रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र ३४ जणांचा मृत्यू झाल्याने वर्षापासून आत्तापर्यंतच्या बळींच्या संख्येने चार हजाराचा टप्पा पार केला आहे.
गुरूवारी (दि.१३) ७ हजार ५१८ रूग्ण बरे झाले असून त्या तुलनेत २२७६ नवे बाधित आढळले आहेत. शहरात तर ही संख्या पुन्हा एकदा चार आकड्यांच्या आत गेली असून दिवसभरात ९९९ नवे बाधित आढळले आहेत. दरम्यान दिवसभरात ३४ रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ग्रामीण भाागातील ३४ तर शहरातील १२ आणि मालेगाव येथील दोन रूग्णांचा समावेश आहे. या रूग्णांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या चार हजार पार गेली आहे.