कांदा बाजारभावात घसरण आवक वाढली : येवला बाजार समितीत उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:10 AM2018-04-11T00:10:48+5:302018-04-11T00:10:48+5:30
येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीसह अंदरसूल उपबाजार आवारात सोमवारी नऊ हजार क्विंटल विक्र मी आवक झाली.
येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीसह अंदरसूल उपबाजार आवारात सोमवारी नऊ हजार क्विंटल विक्र मी आवक झाली. बाजार समितीच्या मुख्य आवारात उन्हाळ कांद्याचा भाव किमान प्रतिक्विंटल २५० रुपये, कमाल ७१३ रुपये, तर सरासरी ६२५ रुपये भाव होते.
अंदरसूल उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान ४०० रुपये, तर कमाल ७२५ रुपये आणि सरासरी ६५० रुपये प्रतिक्विंटल भाव होते. येवला येथील मुख्य आवारात कांदा व भुसार धान्य लिलाव आठवडे बाजार मंगळवारनिमित्त बंद होते. उपबाजार अंदरसूल येथील कांदा लिलाव सुरूच होते. अंदरसूल उपबाजारात मंगळवारी तीन हजार क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांदा प्रतिक्विंटल किमान ३०० तर कमाल ७२४ रुपये, तर सरासरी ६५० रु पये भाव मिळाला. केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य शून्य केले असूनदेखील थंडावलेली कांदा निर्यात तसेच लाल कांद्याबरोबर रांगडा कांद्याची राज्यभरातील सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा वाढती आवक व इतर राज्यातून झालेली कांदा आवक याचा एकूण परिणाम म्हणजे बाजारपेठेतील वेगाने कांदा भावात घसरण होत आहे.