निर्यातमूल्य हटविल्याने कांदा वधारला विंचूर उपबाजारात कांदा भावात सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 01:36 AM2018-02-04T01:36:21+5:302018-02-04T01:36:54+5:30
नाशिक: केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटविल्यानंतर नाशिक जिल्ह्यात शनिवारी झालेल्या लिलावांमध्ये कांद्याचे भाव वाढले असून ते दोन हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
नाशिक: केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटविल्यानंतर नाशिक जिल्ह्यात शनिवारी झालेल्या लिलावांमध्ये कांद्याचे भाव वाढले असून ते दोन हजार रुपयांवर पोहोचले आहेत. कांद्याच्या भावात वाढ झाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. लासलगाव बाजार समिती अंतर्गत विंचूर उपबाजार आवारात शनिवारी झालेल्या लिलावात बाजारभाव कमाल २०६०, किमान १२०० तर सरासरी १८०० रु पये प्रतिक्विंटल राहिले. आवक वाढूनही निर्यात मूल्य हटविल्याने बाजारभावामध्ये वाढ झाली आहे. पिंपळगाव बाजार समितीमध्ये शनिवार कांद्याच्या लिलावात बाजारभाव कमीतकमी १००० तर जास्तीतजास्त २१११ असे राहिले. याचाच अर्थ बाजारभावात आधीच्या दिवसापेक्षा चारशे ते पाचशे रुपयांची भरघोस वाढ झाली आहे . कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटविल्याने लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात शनिवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतिच्या कांद्याला २०६० रुपये प्रतिक्वींटल भाव मिळाला. मागील आठवड्यापासून वेगाने कोसळत असलेल्या कांद्याच्या भावात वाढ झाली असून शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विंचूर उपबाजार आवारात ३७०० असा उच्चांकी दर गाठलेल्या कांद्याचे दर गत आठवड्यापासून खाली येत होते. त्यामुळे निर्यातमूल्य हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. शुक्रवारी कांदा निर्यातमूल्य तडकाफडकी पूर्णत हटविण्याचा निर्णय वाणीज्य मंत्रालयाने जाहीर केल्याने शनिवारी येथील उपबाजार आवारात आवक वाढुन कांदा दरात ५५० रुपयांनी भाव वाढले. निर्यातमूल्य शुन्यावर आल्याने चीन, पाकिस्तान, श्रीलंका या देशांबरोबर स्पर्धा करता येणार असून, बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले. शनिवारी विंचूर उपबाजार आवारात दोन सत्रात लिलाव झाले. उपबाजार आवारात ३७४ नगांची (वाहनांची) आवक होऊन बाजारभाव कमाल २०६०, किमान १२०० तर सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.