कांदा उत्पन्नात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 02:40 PM2018-04-01T14:40:14+5:302018-04-01T14:40:14+5:30
मनोज बागुल, वटार
बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात कांदा काढनीच्या कामांना वेग आला असून रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाच लाल सोन काढण्यासाठी उन्हाच्या झळ अंगावर सोसताना परिसरात दिसत आहे. चालू वर्षी सततच्या हवामान बदलामुळे उत्पन्नात सरासरी ३० ते ४० टक्के घट झाली आहे.
सध्या परिसरात तपमानात मोठी वाढ झाल्याने उन्हाचा पारा चाळिशीच्या आसपास गेल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.कडक उन्हाच्या झळा अंगावर लाही-लाही होत असतानाही बागलाण तालुक्यात कांदा काढणीच्या कामे चालू आहेत. रणरणत्या उन्हाचा चटका गेला दहा-बरा दिवसापासून चांगलाच जाणवत असून,रात्रीच्या वेळेस थंडी,दिवसा कडक उन्हाचा चटका या वातावरणातील उकाडा चांगलाच जाणवत आहे. वटार, डोंगरेज, चौंधाणे, कंधाने, विंचुरे आदी गावांच्या परिसरात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरु असून,चालू वर्षी नदी, नाले, विहिरी, कुपनलिका यांनी पाणी बर्यापैकी असल्यामुळे परिसरात चालू वर्षी कांद्याचे लागवड क्षेत्रात वाढ झाली होती तसेच चालू वर्षी कांद्यासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पन्नात ३० ते ४० टक्के घट झाली आहे.एकीकडे नागरिकांना उन्हामुळे घराच्या बाहेर न निघण्याचे सागितले जातेय तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी व मजूर वर्ग उन्हाच्या झळा अंगावार सोसत कष्ट करताना दिसतोय. दुपारच्या वेळेस कडक उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत असून,तापलेली जमीन व त्यातून निघणार्या तप्त झळा शेतात काम करणार्या महिला व पुरु षाच्या अंगावर चांगलेच चटके देऊन जात आहेत.काढणीस आलेले कांदा पिक उन्हाच्या चटकक्याने भाजू न्हाये म्हणून शेतकरी कांद्याची पात व उसाच्यापाचटाचा वापर करीत असताना दिसत आहेत तर काही ठिकाणी शेतातून कांदा काढून लगेचच चाळीत भरण्यावर शेतकर्यांनी भर दिल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाच्या चटक्याने शेतातील पिके हि पाणी कमी पडल्याने सुकताना दिसत आहेत,दिवसभर काम करताना स्वसंरक्षणासाठी अंग झाकून घ्यावे लागत आहे.म्हणून संरक्षणासाठी मजूर वर्ग टोप्या उपरण्याचा वापर करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादक घेतले जाते.व कांदा हे पिक शेतकर्याच्या अर्थकारणात महतवाची भूमिका बजावणारे पिक असल्याने त्याच्या बाजारभावावर शेतकर्यांची आर्थिक गणतिे अवलबून असतात.कांदा रोप उपलब्ध करण्यापासून ते कांदा लागवड,खुरपणी, औषध फवारणी,काढणी ,भरणी आदीपासून ते काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांची भांडवली गुंतवणूक होते.त्यातच समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही तर भांडवलही सुटत नसल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली.कांद्याला हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकर्याकडून केली जात आहे.