खरिपाच्या पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:30 AM2018-10-07T00:30:46+5:302018-10-07T00:31:13+5:30
नायगाव : खरीप पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात अद्यापपर्यंत एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी खरीप पीक शेतातच करपत असताना रब्बीच्याही आशा धूसर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
दत्ता दिघोळे ।
नायगाव : खरीप पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात अद्यापपर्यंत एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी खरीप पीक शेतातच करपत असताना रब्बीच्याही आशा धूसर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
सध्या शेतीपाठोपाठ पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे बळीराजाला दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजावर शेतकरी वर्गाने खरिपाची पेरणी व अन्य पिकांची लागवड केली होती. पेरणीनंतर अधून-मधून येणाऱ्या रिमझिम पावसाच्या पाण्यावर सोयाबीन, मका, उडीद, मूग, टमाटे, कोबी व फ्लॉवर आदी पिके तग धरून होती. तसेच सोयाबीनसह पेरणी केलेल्या कडधान्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे खरिपाच्या हंगामासाठी शेतकºयांनी केलेला खर्चही पदरात पडला नसल्याने शेतकºयांच्या डोक्यावर आर्थिक बोजाचा भार वाढला आहे. अस्मानी व सुलतानी संकटांतून सध्या शेतकरी मार्गक्रमण करत आहे. पावसाळा संपल्यात जमा झाला आहे. परतीच्या पावसाकडे नजरा लागल्या आहेत. मात्र अद्यापही तालुक्यात जोरदार पाऊस पडला नसल्यामुळे नदी-नाले कोरडेठाक आहेत. शेतकरी येणाºया रब्बी हंगामासही मुकण्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही येत्या काही दिवसात गंभीर होण्याची चिन्हे निर्माण होऊ लागली आहेत. (क्रमश:) गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खरिपाची सर्वच पिके पाण्याअभावी शेतातच करपून गेली आहेत. प्रतिकूल परिस्थितीत पिकविलेल्या मालास बाजारात मातीमोल भाव मिळत आहे.पाण्याअभावी शेतकºयांकडून कांदा रोपांची विक्रीपाऊस सध्या परतीच्या प्रवासात आहे; मात्र तालुक्याच्या कोणत्याच भागावर तो अजूनही बरसला नाही. त्यामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. शेतकरीवर्ग अजूनही परतीच्या पावसाची आस धरून बसलेला आहे. अनेकांनी रब्बीच्या पिकांची लागवड पाणीटंचाई लक्षात घेता थांबवली आहे. पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे लागवडीसाठी आलेल्या कांदा रोपांची विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे.
यंदा खरिपाच्या पिकांना पाणीटंचाईच्या झळा बसल्याने सोयाबीनसह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. त्यामुळे खरिपाच्या हंगामासाठी केलेला खर्चही शेतकºयांच्या पदरात पडत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे. खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून सोयाबीनचे पीक घेतले जाते. यंदा हे पीक पावसाअभावी शेतातच करपले. जेमतेम हाती आलेल्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटल्याने ते तयार करण्यासाठीही शेतकºयांच्या खिशाला झळ बसत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज आहे.
- एकनाथ सानप, शेतकरी, नायगाव