बेदाण्याच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:29 PM2020-01-13T13:29:37+5:302020-01-13T13:29:46+5:30

चांदोरी : अवकाळी पावसाच्या दणक्यामुळे व कडाक्याची थंडी सततचे वातावरण बदल यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असताना आता जिल्ह्यातील बहुतांश भागाचे अर्थकारण अवलंबून असलेल्या द्राक्षपिकालाही त्याचा फटका बसला आहे.

 Decrease in production of freight | बेदाण्याच्या उत्पादनात घट

बेदाण्याच्या उत्पादनात घट

Next

अवकाळीचा फटका : दर वाढण्याची शक्यता, बाजारपेठेत अनेक अडचणीचा सामना

चांदोरी : अवकाळी पावसाच्या दणक्यामुळे व कडाक्याची थंडी सततचे वातावरण बदल यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असताना आता जिल्ह्यातील बहुतांश भागाचे अर्थकारण अवलंबून असलेल्या द्राक्षपिकालाही त्याचा फटका बसला आहे. याचा थेट परिणाम बेदाणा उत्पादनावर होणार असून बेदाण्याचे उत्पादनात घट होवून दरात वाढ होणार आहे.
राज्यातील मोठ्या प्रमाणात बेदाण्याचे उत्पादन जिल्ह्यात होत असते . त्यामुळे बेदाण्याच्या उलाढालीसाठी नाशिकसह , सातारा, सांगली बाजार देशभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी यात वाढ होत असतानाच ,यंदा मात्र निसर्गाच्या फेऱ्यांमुळे बाजारपेठेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात बेदाणे सौदे सुरु झाले असले तरी मालाच्या आवकेवर दर अवलंबून आहेत.सध्या दरामध्ये सरासरी २५ ते ३० रूपयांची वाढ दिसून येत आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा थेट परिणाम यंदा बेदाणा उत्पादनावर दिसून येणार आहे. अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्याने ,मार्केटिंग साठीही अडचणी आल्या आहेत.सध्या दर्जानुसार २०० ते ४०० रु पये प्रति चार किलोचा दर असला तरी ,यापुढे येणाºया मालावर मर्यादा येणार आहेत. सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये घेतलेल्या बागांचा माल फेब्रुवारीमध्ये येणार असून त्यांचे बहुतांश बेदाणा उत्पादन होणार आहे.या सर्व अडचणीचा सामना सध्या बेदाणा उत्पादन करणाºया शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
-------------------------------------
अवकाळीमुळे सलग पंधरा दिवस बागांमध्ये पाणी साचून होते . तर त्यानंतरही चिखल असल्याने शेतकºयांना या अडचणीतून बागा वाचविताना मोठी कसरत करावी लागली आहे. औषधावर व मजुरीवर खर्च झालेल्या यंदा दर चांगला मिळाल्याची शक्यता असली तरी,खर्चही दुपटीने वाढला आहे.

Web Title:  Decrease in production of freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक