तिथी कमी असल्याने  वाढता खर्च ठरतोय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:13 AM2018-04-28T00:13:17+5:302018-04-28T00:13:17+5:30

प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे लग्न समारंभ. या सोहळ्याला मित्र परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी येऊन भेट द्यावी, अशी प्रत्येक वधू-वरांची आणि आई-वडील यांची इच्छा असते मात्र दिवसभरात किमान दहा ते पंधरा लग्न असल्याने सर्व लग्न-कार्याला भेट देताना हैराण झाले आहेत.

 The decrease in the time is due to increasing headaches | तिथी कमी असल्याने  वाढता खर्च ठरतोय डोकेदुखी

तिथी कमी असल्याने  वाढता खर्च ठरतोय डोकेदुखी

Next

सायखेडा : प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे लग्न समारंभ. या सोहळ्याला मित्र परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी येऊन भेट द्यावी, अशी प्रत्येक वधू-वरांची आणि आई-वडील यांची इच्छा असते मात्र दिवसभरात किमान दहा ते पंधरा लग्न असल्याने सर्व लग्न-कार्याला भेट देताना हैराण झाले आहेत.  मार्च महिन्यात लग्न तिथी होत्या. मात्र १९ एप्रिलपर्यंत लग्नाच्या तारखा नसल्याने लग्न सोहळे बंद होते. आता १२ मेपर्यंतच लग्नतिथी असल्याने व नंतर अधिक मास लागणार असल्याने लग्न बंद होतील. २० दिवसाचा मोजका कालावधी असल्याने लगीनघाई सुरू असून, एकाच दिवशी अनेक लग्न आल्यामुळे लग्न ज्या कुटुंबात आहे त्यांच्यावर दुसऱ्या लग्नात नाही गेले तर कोणी रु सत नाही मात्र सामान्य माणूस गेला नाही तर त्यांच्यावर रु सवा फुगवा येतो म्हणून लग्नाला किमान भेट द्यावी लागत असल्याने एकाच दिवशी पंधरा लग्न तेदेखील किमान तीन तासात भेट देताना कसरत करावी लागत आहे.
लग्नतिथीचा कमी कालावधी असल्याने लॉन्स, फोटोग्राफर, केटर्स, मिरवणुकीसाठीचा डीजे, घोडा असे लग्नसराईत महत्त्वाचे तेजीत असणाया व्यावसायिकांचा तोटा आहे. तारखा कमी असल्याने कमी दिवस व्यवसाय चालणार आहे शिवाय एकाच दिवशी एकच आॅर्डर करता येत असल्याने अगदी वीस ते पंचवीस दिवस व्यवसाय तेजीत रहाणार आहे. दोन ते अडीच महिन्याचा मोठा कालावधी व्यवसाय सुरू राहिला असता कमी तारखांचा मोठा फटका बसणार आहे. 
लग्न तारीख धरली असली तरी वधू-वरांकडील माणसांना लग्नाशी संलग्न असलेल्या व्यावसायिकांना आधीच तारखा बुक असल्याने लॉन्स, फोटोग्राफर, डीजे, असे व्यावसायिक मिळत नसल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय जर एखादा मिळालाच तर तो ऐनवेळी अडवणूक करून जास्त पैसे आकारत आहे त्यामुळे खर्चाचा अंदाज वाढत असून, वाढत्या खर्चाने वधू-वरांकडील दोन्ही मंडळी हैराण होत आहे.

Web Title:  The decrease in the time is due to increasing headaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक