देशमाने परिसरात टमाटा लागवडीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:02 PM2020-06-08T22:02:25+5:302020-06-08T23:54:43+5:30
देशमाने परिसरातील शेतकऱ्यांनी टमाटा लागवडीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे नेहमीच्या तुलनेत टमाटा लागवडीत यंदा ७५ टक्के घट झाली आहे.
देशमाने शिवारात टमाटा लागवडीसाठी सुरू असलेली तयारी.
देशमाने : परिसरातील शेतकऱ्यांनी टमाटा लागवडीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे नेहमीच्या तुलनेत टमाटा लागवडीत यंदा ७५ टक्के घट झाली आहे.
यंदा कोरोना संकटाने शेतीवर अनिष्ट परिणाम झाले आहेत. आगामी काळात शेतमाल निर्यातीचे संकट कायम असल्याने पिकविलेल्या टमाटा पिकासाठी योग्य दर मिळेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
परप्रांतीय मजूरदेखील नसल्याने टमाटा बांधणी, तोडणी, वाहतूक आदी कामासाठी अडचण होणार आहे. एकरी लाख रुपये टमाटा पिकासाठी खर्च करावा लागतो. परिस्थिती बदलली नाही तर उत्पादन खर्च तरी निघेल का, अशा प्रश्नामुळे शेतकऱ्यांनी यंदा टमाटा लागवड करण्याचेच टाळले आहे. दरवर्षी मी एक एकर टमाट्याची लागवड करतो. पण यंदा कोरोनामुळे समस्यांचा विचार करत मी लागवड करण्याचे थांबविले. परंतु अन्य नगदी पीक घेण्याचे ठरविले
असल्याची प्रतिक्रिया ज्ञानेश्वर गुंजाळ या टमाटा उत्पादक शेतकºयाने दिली.