शहरातील टोइंगच्या कारवाईत घट

By admin | Published: November 14, 2016 01:03 AM2016-11-14T01:03:16+5:302016-11-14T01:12:35+5:30

शहरातील टोइंगच्या कारवाईत घट

Decrease in towing action in the city | शहरातील टोइंगच्या कारवाईत घट

शहरातील टोइंगच्या कारवाईत घट

Next

 नाशिक : पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्याचा परिणाम ठेकेदारामार्फत राबविल्या जाणाऱ्या पोलीस वाहतूक शाखेच्या टोइंगवरही झाला आहे़ टोइंगच्या कारवाईत सुमारे सत्तर टक्क्यांची घट झाली असून, दंड भरणाऱ्या नागरिकांकडून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत कोणत्याही सूचना न मिळाल्याने वादाचे प्रसंगही घडत आहेत़ दरम्यान, बँका, पोस्ट आॅफिस व एटीएम बाहेर लावण्यात येणारी वाहने उचलली जात नसल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे़
पाचशे व एक हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करण्यात आल्याने सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे़ नागरिकांची नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये झुंबड उडते आहे़ त्यातच नो पार्किंगमध्ये लावलेली वाहने उचलून नेणाऱ्या वाहतूक शाखेस द्यावा लागणाऱ्या दंडाच्या रकमेसाठी सुटे पैसे नसल्याने व पाचशे व एक हजार रुपयांची नोट स्वीकारली जात नसल्याने वादाचे प्रसंग घडत आहेत़ शहर वाहतूक शाखेने बॅँक, एटीएमबाहेर असलेली वाहने उचलणे बंद केल्याने सर्वसामान्यांचा दिलासा मिळाला आहे़

Web Title: Decrease in towing action in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.