विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:56 PM2019-01-09T12:56:32+5:302019-01-09T12:56:40+5:30
खामखेडा : विहिरींच्या पाण्याची पातळी घटल्याने शेतातील लागवड केलेला कांदा पिक पाण्याअभावी करपु लागल्याने कांदा ,गव्हू हरभरा आदि पीके ...
खामखेडा : विहिरींच्या पाण्याची पातळी घटल्याने शेतातील लागवड केलेला कांदा पिक पाण्याअभावी करपु लागल्याने कांदा ,गव्हू हरभरा आदि पीके सोडण्याची वेळ खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे . खामखेडा परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते . उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते.सर्वाधिक कांदा पिकवणारा भाग म्हणून या परिसराकडे पाहिले जाते.गेल्या दोन-तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमीकमी होत चालल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमीकमी होत चालले आहे. पूर्वी गिरणा नदी बारमाही दुथडी भरून वाहत आसे.त्यामुळे शेतकर्याने बॅक ,सोसायटी कडून कर्ज काढून गिरणा नदीच्या काठावरन पाईप लाईन करून शेतीसाठी पाणी नेले .परंतु गेल्या सात-आठ वर्षापासून कमी पावसामुळे एके काळी दुथडी भरून वाहणारी गिरणा नदीचे पात्र पावसाळ्यातही पुर येत नाही . नदीचे पात्र नोव्हेंबर महिन्यात कोरडे होते.त्यामुळे नदीपात्र पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या विहिरिना पाणी राहत नाही .त्यामुळे नदीच्या पाण्यावर अवलबुन आसलेली शेतीतील पिके सोडण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे .