दिंडोरीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 08:56 PM2021-05-18T20:56:50+5:302021-05-19T00:41:08+5:30
दिंडोरी : येथे ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. तिचे लोकार्पण विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
दिंडोरी : येथे ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. तिचे लोकार्पण विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या संकटात वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच घटक काम करत असून त्यासाठी नागरिकांचे चांगले सहकार्यही मिळत आहे. यापुढेही सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन झिरवाळ यांनी केले.
दिंडोरी शहराची लोकसंख्या बघता येथे लसीकरण केंद्र वाढवावेत व जास्त लस उपलब्ध करून देण्याची मागणी विश्वास देशमुख, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, रणजित देशमुख यांनी केली.
झिरवाळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत दिंडोरीत वाढीव लस देण्याच्या सूचना केल्या. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिकेची नितांत गरज होती.
यावेळी झिरवाळ यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव व उपचार याचा आढावा घेतला तसेच लसीकरणाची माहिती घेतली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास पाटील, डॉ. काळे, माधवराव साळुंखे, अविनाश जाधव, रायुकाँ तालुकाध्यक्ष शाम हिरे, दत्तात्रेय जाधव, प्रीतम देशमुख, अनिकेत बोरस्ते आदी उपस्थित होते.