वडांगळीत ठोक अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 09:24 PM2020-07-08T21:24:15+5:302020-07-09T00:33:40+5:30
सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील स्व. राजीव गांधी ग्रंथालय व शहीद संदीप ठोक अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील स्व. राजीव गांधी ग्रंथालय व शहीद संदीप ठोक अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण करण्यात
आले. पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य रवी गडाख, डॉ. झाकीर शेख, माजी सदस्य रामदास खुळे, ग्रीन व्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे, नवनाथ मुरडनर, शंकरराव पानगव्हाणे, सरपंच सुवर्णा कांदळकर, माजी सरपंच सुनीता सैद व उपसरपंच किशोर खुळे आदी उपस्थित होते.
यावेळी ग्रीन व्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे, माजी उपसरपंच नानासाहेब खुळे, विजय गडाख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब खुळे यांनी तर सूत्रसंचालन गणेश कडवे यांनी केले. यावेळी उत्तम कुलथे, शिवाजी खुळे, मंगेश जंगम, सोसायटी चेअरमन शरद खुळे, नितीन खुळे, राहुल खुळे उपस्थित होते.