नांदूरवैद्यला विकासकामांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:08+5:302021-07-05T04:10:08+5:30

यावेळी माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, जिल्हा परिषद सदस्य नयना गावित व ...

Dedication of development works to Nandurvaidya | नांदूरवैद्यला विकासकामांचे लोकार्पण

नांदूरवैद्यला विकासकामांचे लोकार्पण

googlenewsNext

यावेळी माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, जिल्हा परिषद सदस्य नयना गावित व सरपंच उषा रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासकामांची उद‌्घाटने करण्यात आली.

इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे नवीन अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, विजेची बचत होण्यासाठी ग्रामपंचायतीसाठी सौरऊर्जा संच उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेसाठी चारही बाजूने सरंक्षक भिंतीची मागणी मुख्याध्यापक नंदकिशोर बोराडे यांनी ग्रामसभेत केली होती. त्यानुसार शाळेच्या संरक्षक भिंतीचे देखील उद्घाटन करण्यात आले. दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत सुसज्ज समाजमंदिराच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी रमेश गावित, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, शिवसेना नेते राजाराम नाठे, सरपंच उषा रोकडे, माजी उपसरपंच पोपट दिवटे, ॲड. चंद्रसेन रोकडे, ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ मुसळे, माजी सरपंच दिलीप मुसळे, नितीन काजळे, साहेबराव धोंगडे, विविध विकास कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ दिवटे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो- ०३ निर्मला गावित

नांदूरवैद्य येथे विविध विकासकामांचा प्रारंभ व लोकार्पण करताना माजी आमदार निर्मला गावित समवेत जिल्हा परिषद सदस्य नयना गावित, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, सभापती सोमनाथ जोशी, सरपंच उषा रोकडे व इतर ग्रामस्थ.

030721\523403nsk_29_03072021_13.jpg

फोटो- ०३ निर्मला गावीत नांदूरवैद्य येथे विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण करतांना माजी आमदार निर्मला गावित समवेत जिल्हा परिषद सदस्य नयना गावित, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, सभापती सोमनाथ जोशी, सरपंच उषा रोकडे, व इतर ग्रामस्थ.

Web Title: Dedication of development works to Nandurvaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.