सातपूरला आयोसोलेशन सेंटरचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 11:52 PM2021-04-27T23:52:52+5:302021-04-28T00:52:51+5:30

सातपूर : आम्ही सातपूरकर समूहाने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. या सामाजिक उपक्रमास सर्वप्रकारचे सहकार्य केले जाईल; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेवर विश्वास ठेवून शासनाच्या त्रिसूत्री नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केले.

Dedication of Isolation Center at Satpur | सातपूरला आयोसोलेशन सेंटरचे लोकार्पण

सातपूरला आयोसोलेशन सेंटरचे लोकार्पण

googlenewsNext
ठळक मुद्देसामाजिक बांधिलकीतून आयसोलेशन सेंटर

सातपूर : आम्ही सातपूरकर समूहाने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. या सामाजिक उपक्रमास सर्वप्रकारचे सहकार्य केले जाईल; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेवर विश्वास ठेवून शासनाच्या त्रिसूत्री नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केले.

सातपूर येथे सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. सामाजिक बांधिलकीतून आयसोलेशन सेंटर उभारल्याबद्दल आयुक्तांनी सातपूरकरांचे कौतुक केले. हॉस्पिटल उभारणीसाठी डॉक्टर, फिजिशियन यांचा ताफा तयार करण्यासाठी खूप वर्षे लागतात. तरीही मी हरणारा नसून लढणारा आहे. नागरिकांच्या सहकार्याने हे संकट दूर करण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहील. माझी पत्नी, मुलगा कोरोनामुळे बाधित असले तरी मी लढत राहणार असल्याचेही आयुक्त जाधव यांनी सांगितले. नगरसेवक सलिम शेख यांनी प्रास्ताविक केले. या आयसोलेशन सेंटरसाठी नगरसेविका इंदुबाई नागरे, शशिकांत जाधव, यांच्या पुढाकाराने ७० बेड मिळालेत. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. यावेळी नगरसेवक शशिकांत जाधव, योगेश शेवरे, भागवत आरोटे, नगरसेविका हेमलता कांडेकर, इंदुबाई नागरे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम नागरे, संजय जाधव, गौरव जाधव, नितीन निगळ, दीपक मौले, लखन कुमावत, निलेश जाधव, अभिजित शिंदे, बाळासाहेब भोजने, डॉ. अमोल वाजे, संदीप सोनवणे, सचिन सिन्हा, समाधान देवरे आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Dedication of Isolation Center at Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.