केळझर धरणाचे विधिवत जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:17 AM2021-09-14T04:17:28+5:302021-09-14T04:17:28+5:30
बागलाणच्या पश्चिम पट्ट्याबरोबर सटाणा शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका असलेले केळझर (गोपाळसागर) धरण पूर्ण क्षमतेने भरले ...
बागलाणच्या पश्चिम पट्ट्याबरोबर सटाणा शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका असलेले केळझर (गोपाळसागर) धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात गेल्या पाच-सहा दिवसांत झालेल्या संततधार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ५७२ दलघफू. पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या केळझर धरणाच्या सांडव्यावरून सद्यस्थितीत सुमारे ११४४ क्युसेक पाणी आरम नदीपात्रात विसर्ग होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. सोमवारी (दि. १३) आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, पं. स. गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, पं. स. प्रभारी सभापती ज्योती अहिरे, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, संचालक तुकाराम देशमुख, संचालक पंकज ठाकरे, पं. स. सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, पाटबंधारे विभागाचे साहाय्यक अभियंता ए. बी. रौंदळ यांच्यासह पाच शेतकरी दांपत्यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. जलपूजनाचे पौरोहित्य वैभव पाठक यांनी केले.
इन्फो
कौतिकपाड्यापर्यंत पाण्याची मागणी
केळझर चारी क्रमांक ८ वरील सर्व अडचणी लवकरात लवकर दूर करून पूर पाणी कौतिकपाड्यापर्यंत पोहोच करावे. या जलपूजनसारखेच कौतिकपाडे येथे जलपूजन करण्याची आग्रही मागणी या पाटचारीवरील शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे केली.
फोटो- १३ केळझर वाॅटर
केळझर (गोपाळसागर) धरणाचे जलपूजन करताना आमदार दिलीप बोरसे व मान्यवर.
130921\13nsk_29_13092021_13.jpg
फोटो- १३ केळझर वाॅटर केळझर (गोपाळसागर) धरणाचे जलपुजन करताना आमदार दिलीप बोरसे व मान्यवर.