नाशिककरांच्या नव्या लाईफलाईन सिटी लिंकचे आज लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:10+5:302021-07-08T04:12:10+5:30
महाकवी कालिदास मंदिरात सकाळी साडे अकरा वाजता हा सोहळा हेाणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री ...
महाकवी कालिदास मंदिरात सकाळी साडे अकरा वाजता हा सोहळा हेाणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावळ, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह अन्य मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी बुधवारी (दि. ७) पत्रकार परिषदेत दिली.
नाशिकच्या इतिहासात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा नवा अध्याय जोडणाऱ्या या सोहळ्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, नाशिक महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी १९ सप्टेंबर २०१८ रेाजी निर्णय घेण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या वतीने बस कंपनी स्थापन करण्यात आली. शहराची गरज म्हणून आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी ही सेवा हेात असून त्यामुळे खासगी वाहने रस्त्यावर येण्यापासून थांबू शकतील, असा विश्वास आयुक्त जाधव यांनी व्यक्त केला.
इन्फो...
इलेक्ट्रिक बस लवकरच
सिटी लिंकमध्ये एकूण अडीचशे बस असून त्यात दोनशे आणि पन्नास डिझेल मिडी बसचा समावेश आहे. इलेक्ट्रिक बससाठी नियुक्त ठेकेदाराने केंद्र शासनाकडे अनुदानासाठी प्रस्ताव सादर केला असून लवकरच या पर्यावरण स्नेही बसदेखील उपलब्ध हेातील अशी माहितीही आयुक्तांनी दिली.