मालेगाव महापालिका अग्निशमन दलात नवीन वाहनांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 12:57 AM2021-11-04T00:57:20+5:302021-11-04T00:58:21+5:30

मालेगाव येथील महापालिकेच्या अग्निशमन विभागात दोन नवीन मिनी अग्निशमन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर ताहेरा शेख या होत्या.

Dedication of new vehicles in Malegaon Municipal Fire Brigade | मालेगाव महापालिका अग्निशमन दलात नवीन वाहनांचे लोकार्पण

मालेगाव महापालिका अग्निशमन दलात नवीन वाहनांचे लोकार्पण

googlenewsNext

मालेगाव : येथील महापालिकेच्या अग्निशमन विभागात दोन नवीन मिनी अग्निशमन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर ताहेरा शेख या होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर रशीद शेख, उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त भालचंद्र गोसावी, सभागृह नेते असलम अन्सारी, आदी उपस्थित होते. यावेळी महापौर शेख म्हणाल्या की, झोपडपट्टीवासीयांचे शहर असल्याने ज्या ठिकाणी छोटे रस्ते आहेत, त्या ठिकाणी मोठी अग्निशमन वाहने जाण्यास अडचणी येत होत्या. परिणामी आगीवर नियंत्रण मिळविण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याचा प्रत्यय शहरातील नागछाप झोपडपट्टी घटनेप्रसंगी आला आहे. मोठे अग्निशमन वाहन जाण्यास अडचण निर्माण झाली होती. तरीही अग्निशमन विभागातील कर्मचारी यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. या सर्व बाबींचा महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी अभ्यास करून महापालिकेच्या जनरल निधीतून ५० लाखांची अत्याधुनिक दोन मिनी अग्निशमन वाहने घेण्याचा निर्णय घेतला व दिवाळीच्या शुभमुहूर्तावर वाहनांचे लोकार्पण करून वाहने शहरवासीयांच्या सेवेसाठी सुसज्ज राहतील, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. अग्निशमन अधिकारी संजय पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास उपायुक्त (मुख्यालय) राजू खैरनार, जनसंपर्क अधिकारी हरीश डिंबर, पदाधिकारी व महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

फोटो- ०३ मालेगाव फायर

मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन दलात दोन नवीन वाहनांचे लोकार्पण करताना महापौर ताहेरा शेख. समवेत उपमहापौर नीलेश आहेर, माजी महापौर रशीद शेख, आयुक्त भालचंद्र गोसावी, आदी उपस्थित होते.

Web Title: Dedication of new vehicles in Malegaon Municipal Fire Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.