इगतपुरीत महामार्ग पोलीस केंद्रावर रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 11:30 PM2022-03-29T23:30:50+5:302022-03-29T23:31:30+5:30

इगतपुरी : कसारा घाटात नेहमीच अपघात होत असतात. या अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळवून अत्याधुनिक मदत मिळावी व रुग्णांचा प्राण वाचवा यासाठी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

Dedication of ambulance at Highway Police Station, Igatpuri | इगतपुरीत महामार्ग पोलीस केंद्रावर रुग्णवाहिकेचे लोकार्पण

इगतपुरी येथील घोटी टॅब येथे अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पण करताना तहसीलदार परमेश्वर कासुळे, अमोल वालझाडे, डॉ. नायकवाडी, डॉ. स्वरूपा देवरे, मुख्याधिकारी पंकज गोसावी, पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर. 

Next
ठळक मुद्देलोकार्पण सोहळा तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते

इगतपुरी : कसारा घाटात नेहमीच अपघात होत असतात. या अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळवून अत्याधुनिक मदत मिळावी व रुग्णांचा प्राण वाचवा यासाठी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक सुनील बच्छाव, इगतपुरी पोलीस निरीक्षक वसंत पथवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, डॉ. अमन नायकवडी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, मुख्याधिकारी पंकज गोसावी, घोटी सहाय्याक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, एक्सप्रेस हायवेचे मॅनेजर आनंद ब्री सिंह, घटनदेवी ट्रस्टचे ताराचंद भरिंडवाल यांच्या उपस्थितीत अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा झाला.

यावेळी जनसेवीचे अध्यक्ष किरण फलटकर, डॉ. अमन नायकवडी, महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी अमोल वालझाडे, डॉ. मनोज नेटावटे, डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. योगेश भागडे, डॉ. शैलेश देशपांडे, दत्ता सदगीर, डॉ. घनशाम बरे, योगेश मालपाणी, हरीश चवबे, महेश शिरोळे, अनिल भोपे, सुनील आहेर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अमोल वालझाडे यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील आहेर व आभार किरण फलटणकर यांनी केले.
 

Web Title: Dedication of ambulance at Highway Police Station, Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.