सोनांबेत माऊली अभ्यासिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 12:07 AM2022-02-08T00:07:18+5:302022-02-08T00:08:47+5:30
सिन्नर : ग्रामीण भागातील होतकरू युवकांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सुविधा निर्माण व्हावी, याकरिता सोनांबे येथे माऊली अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. अभिनेते डॉ. सुयोग गोरे, फाऊंडेशनचे व्यवस्थापक श्रीकिसन वलवे यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. सारडा उद्योग समूह, नाशिकला १०० वर्ष पूर्ण झाल्याने सामाजिक बांधिलकी जपत श्रीरंग किसनलाल सारडा चॅरिटेबल फाऊंडेशनच्या सहाय्याने हा उपक्रम सुरू केल्याचे वलवे यांनी सांगितले.

ज्ञानाने सर्व काही मिळवता येते. फक्त नोकरी म्हणून ज्ञान घेऊ नये. युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊन गावासह तालुक्याचे नाव उंचवावे, असे अभिनेते सुयोग गोरे यांनी सांगितले. रामनाथ डावरे, शरद रत्नाकर, नवले यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी अभ्यासिका अधिकारी योगेश तारडे, सरपंच डॉ. रवींद्र पवार, उपसरपंच संतोष डगळे, रामनाथ डावरे, शरद रत्नाकर, संदीप पडवळ, एकनाथ पवार, तानाजी पवार, ग्रामपंचायत सदस्य भगवान पवार, योगेश पवार, सोमनाथ पवार, विकास पवार, सुभाष जोरवे, पोलीस पाटील चंद्रभान पवार, दामोदर बोडके, सुधाकर नवले, विकास पवार, जनार्दन पवार, ग्रामसेवक शिवाजी सुंबे आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. अनिल पवार यांनी सूत्रसंचालन केले.