भारतीय जैन संघटनेतर्फे ऑक्सिजन यंत्राचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 00:46 IST2021-06-09T22:17:25+5:302021-06-10T00:46:41+5:30

नांदगाव : भारतीय जैन संघटना, नांदगाव शाखेच्या वतीने उद्योजक गणेश पारख यांनी दिलेल्या स्वयंचलित ऑक्सिजन यंत्राचे लोकार्पण रंजनाबाई पारख यांच्या हस्ते झाले.

Dedication of Oxygen Machine by Indian Jain Association | भारतीय जैन संघटनेतर्फे ऑक्सिजन यंत्राचे लोकार्पण

स्वयंचलित ऑक्सिजन यंत्राचे लोकार्पण करताना डॉ. रोहन बोरसे, अनिल कातकाडे, दत्तराज छाजेड, गणेश पारख आदी.

ठळक मुद्देकोरोना योद्धा म्हणून डॉ. रोहन बोरसे यांना गौरविण्यात आले.

नांदगाव : भारतीय जैन संघटना, नांदगाव शाखेच्या वतीने उद्योजक गणेश पारख यांनी दिलेल्या स्वयंचलित ऑक्सिजन यंत्राचे लोकार्पण रंजनाबाई पारख यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी कोरोना योद्धा म्हणून डॉ. रोहन बोरसे, पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, हिसवळ आरोग्य केंद्राचे डॉ. संतोष जगताप, आदर्शगाव हिसवळचे सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, पत्रकार रोहित शेळके यांना नवकार महामंत्राची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.
जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य दत्तराज छाजेड यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी देणगीदार गणेश पारख, शहराध्यक्ष डॉ. रमणलाल गादिया, प्रदीप सिसोदिया, कमलेश पारख, दिलीप लोढा, महेंद्र आबड, नीलेश सुराणा, आनंद चोपडा, युवा अध्यक्ष अमित चोरडिया, संदीप लोढा, शैलेश चोपडा, संदीप सिसोदिया, भरत पारख, ॲड. सरोदे, नितेश पारख, चेतन कोचर, अंकुर पारख, सम्यक पारख, महिला शाखेच्या अध्यक्ष आशा सुराणा, शांताबाई पारख, दीपिका पारख, संगीता पारख आदी उपस्थित होते.

Web Title: Dedication of Oxygen Machine by Indian Jain Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.