येवल्यात ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:12 AM2021-05-31T04:12:22+5:302021-05-31T04:12:22+5:30

भुजबळ यांच्या हस्ते रविवारी (दि. ३०) येवला उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट व रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ...

Dedication of Oxygen Project at Yeola | येवल्यात ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण

येवल्यात ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण

Next

भुजबळ यांच्या हस्ते रविवारी (दि. ३०) येवला उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट व रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात २, जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रात ९, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येवला, मनमाड, कळवण, चांदवड, ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव बसवंत, इगतपुरी, सिन्नर, अभोणा, वणी, दिंडोरी, बार्‍हे, घोटी, गिरणारे, हरसूल, निफाड, नगरसूल, लासलगांव, देवळा, उमराणे, सटाणा, नामपूर, मालेगाव सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालय अशा २४ ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

इन्फो

सीएसआर फंडातूनही प्रकल्प

केंद्र सरकारच्या निधीतून नांदगाव, दाभाडी, पेठ सुरगाणा या चार ठिकाणी, तर सिक्युरिटी प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी व त्र्यंबकेश्वर, गिरणारे, डांगसौंदाणे, तसेच नाशिक ग्रामीणसाठी ५ असे एकूण ५५ ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार असल्याचे यावेळी भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयाची व कोविड सेंटरची पाहणीही यावेळी केली.

फोटो- ३० येवला येथे ऑक्सिजन प्रकल्प व रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत अधिकारी व कर्मचारी.

===Photopath===

300521\30nsk_42_30052021_13.jpg

===Caption===

फोटो-  ३० येवला येथे ऑक्सिजन प्रकल्प व रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत अधिकारी व कर्मचारी. 

Web Title: Dedication of Oxygen Project at Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.