एकात्मता चाैकात पाेलीस चाैकीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:06 AM2021-05-04T04:06:51+5:302021-05-04T04:06:51+5:30
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी एकात्मता चाैकात कायमस्वरुपी पाेलीस मदत केंद्र सुरु करण्याची मागणी हाेत हाेती. या मागणीची दखल ...
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी एकात्मता चाैकात कायमस्वरुपी पाेलीस मदत केंद्र सुरु करण्याची मागणी हाेत हाेती. या मागणीची दखल घेत पाेलीस प्रशासनाने चाैकी कार्यान्वित केली. चाैकीत चाेवीस तास पाेलीस बंदाेबस्त राहाणार आहे. चाैकीच्या क्षेत्रात इदगाह मैदान, नियोजित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, शासकीय विश्रामगृह, कॅम्प राेड अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. चाैकी सुरु झाल्याने समाजकंटक व टवाळखाेरांना पायबंद बसणार आहे. चाैकी परिसरात पाच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कॅमेऱ्यात सर्व हालचाली कैद हाेणार असल्याने गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे साेपे हाेणार आहे. चाैकीत बंदाेबस्तावरील कर्मचाऱ्यांसाठी आसनव्यवस्था व इतर सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. चाैकी उभारणीसाठी राजधानीचे संचालक संजय फतनानी यांनी सहकार्य केले. याप्रसंगी कॅम्पचे पाेलीस उपअधीक्षक प्रवीण जाधव आदी उपस्थित हाेते.
फोटो- ०३ मालेगाव पोलीस चौकी
===Photopath===
030521\03nsk_13_03052021_13.jpg
===Caption===
फोटो- ०३ मालेगाव पोलीस चौकी