जायगाव येथे ग्रामविकास केंद्राचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:16 AM2021-02-24T04:16:18+5:302021-02-24T04:16:18+5:30
रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, पंढरीनाथ थोरे, युवा नेते उदय सांगळे, पंचायत समितीच्या सभापती ...
रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, पंढरीनाथ थोरे, युवा नेते उदय सांगळे, पंचायत समितीच्या सभापती शोभा दीपक बर्के, उपसभापती संग्राम कातकाडे, आशालता दिघोळे, अभिजीत दिघोळे, नगराध्यक्ष किरण डगळे, कोंडाजीमामा आव्हाड, दिगंबर गीते, पी. आर गीते किरण काकड, पंचायत समितीचे सदस्य जगन्नाथ भाबड, गोदा युनियनचे लक्ष्मण सांगळे, किशोर काकड, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, विनायक शेळके, भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, आनंदा शेळके आदी उपस्थित होते.
वाजे म्हणाले की, सोहळ्यानिमित्त दिघोळे यांच्या कर्तबगारीला उजाळा मिळाला. माजी आमदार सूर्यभान गडाख व दिघोळे यांनी आदर्शवत काम केली. माजी मंत्री दिघोळे यांची कामे तालुक्याला भविष्यातही स्मरणात राहणारी आहेत. पंढरीनाथ थोरे यांनी दिघोळे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते, असे मत व्यक्त केले.
दिघोळे यांनी अनेक कार्यकर्ते घडवल्याचे सांगून युवा नेते उदय सांगळे यांनी त्यांच्या नावाने उभ्या केलेल्या ग्राम विकास केंद्राचे लोकार्पण करताना मनापासून आनंद होत असल्याचे सांगितले.रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी दिघोळे यांच्या कार्याची माहिती देताना आदर्शवत कामे उभी केल्याचे सांगितले. अभिजीत दिघोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास रघुनाथ दिघोळे, भारत दिघोळे, सुखदेव चेवले, एकनाथ दिघोळे, ज्ञानेश्वर दिघोळे, संदीप दिघोळे, खंडेराव दिघोळे, रामनाथ चेवले, अशोक बोडके, संभाजी गायकवाड, मोहन कातकाडे, भाऊसाहेब कातकाडे, बाळासाहेब केदार, किरण गीते, एम.पी कातकाडे, तुकाराम सांगळे, विलास सांगळे, पी डी गीते, रामदास बोडके आदींसह तालुक्यातील विविध गावांतून नागरिक उपस्थित होते.
फोटो- २३जायगाव दिघोळे
सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे ग्राम विकास केंद्राचे लोकार्पण प्रसंगी राजाभाऊ वाजे, रामराव महाराज ढोक, पंढरीनाथ थोरे, उदय सांगळे, संग्राम कातकाडे, अभिजीत दिघोळे, किरण डगळे, कोंडाजी आव्हाड, दिगंबर गीते, लक्ष्मण सांगळे आदि.
===Photopath===
230221\23nsk_51_23022021_13.jpg
===Caption===
फोटो- २३जायगाव दिघोळे सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे ग्राम विकास केंद्राचे लोकार्पण प्रसंगी राजाभाऊ वाजे, रामराव महाराज ढोक, पंढरीनाथ थोरे, उदय सांगळे, संग्राम कातकाडे, अभिजीत दिघोळे, किरण डगळे, कोंडाजी आव्हाड, दिगंबर गीते, लक्ष्मण सांगळे आदि.