बागलाण तालुक्यात सात बंधाऱ्यांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:34+5:302021-06-25T04:12:34+5:30

सटाणा : बँकेच्या अर्थसहाय्यातून संजीवनी सक्षमीकरण व विकास संस्था यांच्यामार्फत समग्र ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत बागलाण तालुक्यातील ११ गावांमध्ये राबविण्यात ...

Dedication of seven dams in Baglan taluka | बागलाण तालुक्यात सात बंधाऱ्यांचे लोकार्पण

बागलाण तालुक्यात सात बंधाऱ्यांचे लोकार्पण

googlenewsNext

सटाणा : बँकेच्या अर्थसहाय्यातून संजीवनी सक्षमीकरण व विकास संस्था यांच्यामार्फत समग्र ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत बागलाण तालुक्यातील ११ गावांमध्ये राबविण्यात आलेल्या विकासकामांचे तसेच सात बंधाऱ्यांचे लोकार्पण व नवीन १४ गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकासकामांचा शुभारंभ बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.

संजीवनी संस्थेचे सहाय्यक संचालक नामदेव नागरे यांनी संस्थेची ध्येय व धोरणे यांची माहिती दिली. तर संदीप पवार व राकेश मोरे यांनी ११ गावात जल व मृद संधारण, शेती विकास, महिला सक्षमीकरण, शालेय उपक्रम, ग्रामीण जीवन आधारित उपकम, गाव पातळीवरील संस्था विकास या उपक्रमातून अनुक्रमे पिंपळदर व चौंधाणे या गावात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आमदार दिलीप बोरसे यांनी संस्थेने राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यकमात सर्व ११ गांवाना काम पूर्ण केल्याचे हस्तांंतरण पत्र व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच पंचवीस गावातील ग्रामपंचायतींना कोविड सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन रोडजी ठाकरे यांनी केले. याप्रसंगी एचडीएफसी बँकेचे व्हाईस प्रेसिडंट अँँण्ड क्लस्टर हेड सुमन ठाकूर, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा, पंचायत समिती बागलाणचे गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, नायब तहसीलदार नेरकर, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, एचडीएफसी बँकेचे सटाणा शाखा प्रमुख दिनेश अहिरे, सटाणा तालुका सरपंच युनियनचे अध्यक्ष संदीप पवार, पिंगळवाडे येथील प्रगतशील शेतकरी केदा बापू भामरे, चौंंधाणेच्या सरपंच लीलावती मोरे, संजीवनी संस्थेचे सहाय्यक संचालक नामदेव नागरे, चौंधाणेचे माजी सरपंच राकेश मोरे उपस्थित होते.

इन्फो

या उपक्रमांचे झाले लोकार्पण

बागलाणमधील दर्हाणे, पिंपळदर ,खमताने, नवे निरपुर, चौंधाणे, पिंगळवाडे, मुळाणे, कोटबेल, खिरमानी, कुपखेडा व कर्हे या ११ गावांमध्ये जलसंधारण- सिमेंट बंधारे, जुने बंधारे दुरुस्ती, शेती विकास- शेडनेट, महिला सक्षमीकरण, आरोग्य जाणीव जागृती, डिजिटल स्क्रीन आदी उपक्रमांचे लोकार्पण झाले तर दहिंदुले, जोरण, वटार ,वनोली, तरसाळी, भाक्षी, दोधेश्वर, रामतीर रातिर, चौगाव, यशवंतनगर, अजमीर सौंदाणे, देवळाणे व सुराणे या १४ गावांतही उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

फोटो : २४ बागलाण बँक

समग्र ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत सिमेंट बंधारे व अन्य उपक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या पिंपळदर ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल पवार, संदीप पवार यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत सुमन ठाकूर, पांडुरग कोल्हे आदी.

===Photopath===

240621\24nsk_35_24062021_13.jpg

===Caption===

फोटो : २४ बागलाण बँक समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत सिमेंट बंधारे व अन्य उपक्रम प्रभावीपणे राबविणार्‍या पिंपळदर ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल पवार ,संदीप पवार यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करतांना आमदार दिलीप बोरसे. समवेत सुमन ठाकूर, पांडुरग कोल्हे  आदी. 

Web Title: Dedication of seven dams in Baglan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.