राज्यव्यापी शिक्षण दिंडीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:39 PM2020-12-21T17:39:48+5:302020-12-21T17:40:46+5:30
येवला : शिक्षणाचा नवा अध्याय या रोज फाउंडेशन आणि प्रवाह संस्थेच्या राज्यव्यापी शिक्षण दिंडीचा लोकार्पण सोहळा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला येथे संपन्न झाला.
येवला : शिक्षणाचा नवा अध्याय या रोज फाउंडेशन आणि प्रवाह संस्थेच्या राज्यव्यापी शिक्षण दिंडीचा लोकार्पण सोहळा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला येथे संपन्न झाला.
कोविड महामारीच्या काळातहा उपक्रम समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात महत्त्वाची भूमिका अदा करेल, असा विश्वास यावेळी बोलतांना भुजबळ यांनी व्यक्त केला.
याउपक्रमांतर्गत इयत्ता १ ली ते ८ वी वर्गांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना माईंडस्पार्क ह्या वेब अप्लिकेशनचा वापर शिक्षणासाठी मोफत करता येणार आहे. यावेळी राजेंद्र जाधव, विजया दुर्धवळे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षण दिंडी उदघाटन समारंभ यशस्वतेसाठी शंकर मांजरे, संजय गांगुर्डे, नितेश जंगम, रक्षा झाल्टे, बाळासाहेब लोखंडे, संजीवनी संस्थेचे सुभाष गांगुर्डे, बंडू शिंदे. दीपक लोणारी, संतोष राऊळ, सुमित थोरात आदींनी परीश्रम घेतले.