पुरणगाव येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 07:18 PM2021-03-03T19:18:13+5:302021-03-04T01:08:18+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथे ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातुन उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथे ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातुन उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य युवा सेना विस्तारक कुणाल दराडे यांच्या हस्ते व सरपंच मंदाकिनी ठोंबरे, उपसरपंच रामनाथ ठोंबरे, सदस्य श्रावण ठोंबरे यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. पुरणगाव येथील ग्रामस्थांना जलस्वराज्य प्रकल्पातील विहिरीवरून पाणी पुरवठा केला जातो, पण शुद्ध पाण्याची गरज लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला.
गावाला शुद्ध पाणी मिळणार असल्याने पाण्यापासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण यामुळे कमी होणार आहे. यावेळी नानासाहेब ठोंबरे, श्रावण ठोंबरे, मच्छिंद्र ठोंबरे, मेघश्याम ठोंबरे, सतीश ठोंबरे, संतोष ठोंबरे, विजय ठोंबरे, सागर ठोंबरे, मच्छिंद्र गाढे, प्रमोद वरे, बापू थेटे, व्ही. आर .कवडे सुरेश ठोंबरे, रहिम शेख आदी उपस्थित होते.