असुरक्षिततेची दाटली भीती; ६४ लोकांनी घेतले ‘शस्त्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:50+5:302021-07-20T04:11:50+5:30

नाशिक : शहर व परिसरात स्वसंरक्षणाचे कारण देत मागील दोन वर्षांमध्ये शस्त्र परवाने मिळविणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. ...

Deep fear of insecurity; 64 people take up arms | असुरक्षिततेची दाटली भीती; ६४ लोकांनी घेतले ‘शस्त्र’

असुरक्षिततेची दाटली भीती; ६४ लोकांनी घेतले ‘शस्त्र’

Next

नाशिक : शहर व परिसरात स्वसंरक्षणाचे कारण देत मागील दोन वर्षांमध्ये शस्त्र परवाने मिळविणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. २०१९ सालापासून मागील वर्षापर्यंत ६४ लोकांनी पोलीस आयुक्तालयाकडून शस्त्र परवाने मिळविले आहेत. शस्त्र परवाने मिळविण्यामागे खरीखुरी असुरक्षिततेची भीती की बडेजावपणाची फॅशन? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्वत:च्या जीवितास धोका असल्याचा पुरावा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सादर करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे पटवून दिल्यानंतर शस्त्र वापरण्याचा परवाना मिळतो; मात्र तत्पूर्वी शस्त्र वापरण्याचा परवाना मिळावा, यासाठी ज्याने अर्ज केला आहे, त्या व्यक्तीची शहनिशा करून चारित्र्याची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येते. यानंतरच त्या व्यक्तीला शस्त्र वापरण्याचा परवाना दिला जातो. यावेळी त्याची नियमावली आणि मार्गदर्शक तत्वेदेखील शस्त्र परवानाधारकाला समजावून सांगितली जातात. शस्त्राचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास किंवा त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संंबंधिताचा परवाना पोलिसांकडून तत्काळ रद्द करून शस्त्रही जमा करून घेतले जाऊ शकते.

--इन्फो--

...कोणाला मिळतो शस्त्र परवाना

नामांकित मोठे उद्योजक, मोठे सराफ व्यावसायिक, व्यापारी तसेच लोकप्रतिनिधी ज्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असेल किंवा कोणाकडून जीवे ठार मारण्याची धमकी आली असेल किंवा प्राणघातक हल्ला लुटीच्या इराद्याने अथवा जीवे मारण्याच्या उद्देशाने झाला असल्यास आत्मसंरक्षणाकरिता तो पोलिसांकडे शस्त्र वापरण्याचा परवाना मिळावा, म्हणून अर्ज करू शकतो; मात्र त्याच्याविरुद्ध तत्पूर्वी कोणत्याही पोलीस ठाण्यात कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नसावा.

--इन्फो--

...तर शस्त्र परवानाधारकावर कारवाई

परवानाधारक व्यक्तीला शस्त्र मिरविता येऊ शकत नाही, किंवा त्या शस्त्राचा वापर धाकदपटशाकरिता करता येऊ शकत नाही. शस्त्राद्वारे हवेत गोळीबार वगैरे केला किंवा कोणत्याही व्यक्तीला धमकावले तर पोलिसांकडून संबंधित शस्त्र परवानाधारकाविरुद्ध कायदेशीर कारवाईदेखील केली जाते. यापूर्वी शहरात तसेच जिल्ह्यात काही परवानाधारकांची शस्त्रे पोलिसांनी जप्तदेखील केली आहेत.

--इन्फो---

सहा वर्षातील शस्त्र परवाने

२०१६- ३१

२०१७- १७

२०१८- २१

२०१९-३९

२०२०- २५

२०२१- ००

--इन्फो--

२०१९मध्ये ३९ शस्त्र परवाने

२०१९साली लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे वारे होते. यावेळी निवडणूक आखाड्यात उतरलेल्या व्यक्तींना धमक्यांचे प्रकारही घडले. याकाळात बहुतांश लोकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्र वापरण्याचा परवाना पोलिसांकडून प्राप्त करून घेतला. या वर्षभरात तब्बल ३९ लोकांना शस्त्र वापरण्याचे परवाने पोलीस आयुक्तालयाकडून दिले गेले.

190721\19nsk_2_19072021_13.jpg

शस्त्र परवाने

Web Title: Deep fear of insecurity; 64 people take up arms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.