सप्तशृंगगडावर दीपप्रज्वल

By admin | Published: November 15, 2016 01:26 AM2016-11-15T01:26:38+5:302016-11-15T01:43:07+5:30

सप्तशृंगगडावर दीपप्रज्वल

Deep prajaval on Saptashringgad | सप्तशृंगगडावर दीपप्रज्वल

सप्तशृंगगडावर दीपप्रज्वल

Next

पांडाणे : साडेतीन शक्तिपीठापैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्याचे प्रज्वलन करून दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.देव-दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रूद्ध झाले आणि त्यांनी दैत्यांच्या संहारासाठी आपल्या देहातून असुरी शक्ती निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून, ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असल्याचे आख्यायिकेत म्हटले आहे, असे प्रकाश जोशी यांनी सांगितले.४त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आदिमायेने त्रिपुरासुराचा वध करून दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने आंध्र प्रदेश, गुजरात राज्यासह मुंबई, अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतून भाविक भगवतीच्या दर्शनासाठी येतात. यानिमित्ताने हजारो भाविकांनी सप्तशृंगीचे दर्शन घेतले.

Web Title: Deep prajaval on Saptashringgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.