मंदिरांमध्ये उजळले दीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:37 AM2017-11-05T00:37:54+5:302017-11-05T00:37:58+5:30

कार्तिक पौर्णिमेनिमित्त शहरातील विविध मंदिरे सहस्त्र दिव्यांनी उजळून निघाली होती. मुक्तिधाम मंदिर व विहितगाव येथील श्री अण्णा नवग्रह गणपती मंदिरात श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

Deep in the temples | मंदिरांमध्ये उजळले दीप

मंदिरांमध्ये उजळले दीप

Next

नाशिकरोड : कार्तिक पौर्णिमेनिमित्त शहरातील विविध मंदिरे सहस्त्र दिव्यांनी उजळून निघाली होती. मुक्तिधाम मंदिर व विहितगाव येथील श्री अण्णा नवग्रह गणपती मंदिरात श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.  नववर्ष स्वागत यात्रा समिती व बिटको चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने मुक्तिधाम मंदिराच्या प्रांगणात कार्तिक पौर्णिमेनिमित्त २० बाय ४० फूट आकाराची भव्य रांगोळी काढण्यात आली होती. त्या रांगोळीवर सायंकाळी चार हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले होते.  मुक्तिधाम मंदिरातील श्री कार्तिक स्वामी मंदिर हे वर्षातून एकदाच श्री कार्तिक पौर्णिमेला भाविकांच्या दर्शनासाठी उघडले जाते. शनिवारी सकाळपासूनच मुक्तिधाम मंदिरातील श्री कार्तिक स्वामींच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याने भाविकांची रांग मंदिराबाहेर आलेली होती. भाविकांकडून श्री कार्तिक स्वामींना मोरपीस अर्पण करण्यात येत होते. तसेच विहितगावातील श्री अण्णा नवग्रह गणपती मंदिरातील श्री कार्तिक स्वामींची मूर्ती मोरपीस लावून सजविण्यात आलेली होती.

Web Title: Deep in the temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.