राजापूर वाड्या-वस्त्यावर तीव्र पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 07:35 PM2019-06-22T19:35:51+5:302019-06-22T19:36:06+5:30

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अत्यल्प प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे दुष्काळामुळे जनता हैराण झालेली आहे. उन्हाची तीव्रता हि वाढत्या प्रमाणात आहे. जून सुरू होऊन वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या-वस्त्यावर पिण्यासाठी पाणी टंचाई भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Deep water scarcity on Rajapur staircase | राजापूर वाड्या-वस्त्यावर तीव्र पाणी टंचाई

राजापूर वाड्या-वस्त्यावर तीव्र पाणी टंचाई

Next
ठळक मुद्देटॅकरच्या खेपा वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अत्यल्प प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे दुष्काळामुळे जनता हैराण झालेली आहे. उन्हाची तीव्रता हि वाढत्या प्रमाणात आहे. जून सुरू होऊन वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या-वस्त्यावर पिण्यासाठी पाणी टंचाई भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
जून महिना देखील उन्हाळयासारखाच जाणवतो आहे. प्रत्येकजण सावलीचा आधार घेतो. सध्या उन्हाची तीव्रता हि जास्तच वाढल्यामुळे घरात जीवाची तहान भागविण्यासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी पाणी राजापूर व पूर्वकडील भागात दुष्काळामुळे पाणी टंचाई असल्याने टॅकरच्या खेपामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
राजापूर येथील वाड्या-वस्तीवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राजापूर हे गाव मोठे असल्याने येथे दोन टॅकरने पाणी पूरवठा सुरू असून गावासाठी दोन खेपा तर वाड्या-वस्त्यावरील लोकांना दोन खेपा सध्या सुरू आहे. परंतू जून महिना सुरू झाला अन पाणी टंचाईने जनता हैराण झाली आहे. येथील जनतेला पिण्यासाठी पाणी व जनावरांचा चारा या संकटाने शेतकरी धास्तावले आहे.
विहिरी कोरड्या पडल्या असल्यानेपाणी कोठे मिळेल या चिंतेने येथील जनता हैराण झाले आहेत. अलगट वस्ती, हवालदार वस्ती,भैरवनाथवाडी या तीन वाड्या मोठ्या आहेत, तर काही वस्त्या वाड्या-मोठ्या असून तसेच काही लहान वाड्या वस्त्या आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीला पाणी वाटप करतांना कसरत करावी लागत आहे जेवढे गाव आहे त्यापेक्षा जास्त जनता वाड्यावस्तीवर राहत असल्याने एकदा टॅकर आल्यावर २० ते २२ दिवसांनी पून्हा त्या वस्तीवरील जनतेला पाणी मिळते आहे गाव दुष्काळी मंडलात असूनही शासनाने पाहीजे त्याप्रमाणे पाणी मिळत नाही व जनावरांना चारा नाही या दोन्ही समस्याने जनता हवालिदल झाली आहे अजून पाऊस झाला नसल्याने सगळ्याचे डोळे आकाशाकडे लागले आहे कधी एकदाचा पाऊस पडेल अन पिण्यासाठी पाणी मिळेल अशी आशा येथील जनतेला लागली आहे.
सध्या पाण्याचे टॅकर पुरत नाही एका वस्त्यावर नंबरप्रमाणे टॅकर गेला कि मोठ्या वस्त्यावर १२ हजार लिटरच्या टॅकरच्या ६ ते ७ खेपा लागतात तेव्हा त्या वस्त्यावर दोनशे ते चारशे लीटरचे पाणी मिळते सध्या २४ हजार लिटरचा एक टॅकर व १२ हजार लिटरचा एक टॅकरच्या दोन खेपा होतात. मात्र ते पुरत नाही. गावात वीस दिवसापासुन तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पाणी वाटप करताना ग्रामपंचायतीला मोठी कसरत करावी लागतेआहे. त्यामुळे गावासाठी व वाड्या-वस्त्यावर टॅकरच्या खेपामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी व वाड्या वस्त्यावरील रिहवासायांनी केली आहे.
(फोटो २२ राजापूर)

Web Title: Deep water scarcity on Rajapur staircase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.