वाखारवाडी येथे तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: March 10, 2016 11:20 PM2016-03-10T23:20:04+5:302016-03-10T23:28:29+5:30
वाखारवाडी येथे तीव्र पाणीटंचाई
लोहोणेर : वाखारवाडी (ता. देवळा) येथे गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना, शासकीय स्तरावरून जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार चालू असून, पाण्यासाठी कोणतीही मदत मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून, दोन दिवसात टॅँकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर
तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वाखारवाडी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
त्याव्यतिरिक्त गेल्या दोन महिन्यात एकही दिवस सदर योजनेतून पाणीपुरवठा होऊ शकला नाही. याबाबत पंचायत समिती, तहसीलदार, उपअभियंता लघु पाटबंधारे विभाग कळवणच्या देवळा सामुदायिक पाणीपुरवठा योजना आदिंशी वेळोवेळी लेखी, तोंडी गावातील नागरिकांनी, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीटंचाईबाबत तक्रार करूनही कोणताही उपयोग झाला नाही.
तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय म्हणते लघु
पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांचे टॅँकरसाठी शिफारसपत्र हवे आहे, तर लघु पाटबंधारे विभाग म्हणते
पाणी येईल अशा गोंधळात वाखारवाडीच्या ग्रामस्थांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार चालू असून, दोन दिवसात टॅँकरने पाणीपुरवठा चालू झाला नाही तर महिलांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा
इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे.
निवेदनावर सरपंच संगीता पवार, उपसरपंच बी. एस. निकम, सदस्य साहेबराव पवार, रमेश निकम, विष्णू निकम, पोपट निकम, दत्तू निकम, अशोक निकम आदिंसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)