दीपक पांडेय मुंबईतच, नव्या आयुक्तांच्या चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2022 01:32 AM2022-04-09T01:32:04+5:302022-04-09T01:33:05+5:30
महसूल यंत्रणेला अंगावर घेतल्यानंतर वादात सापडलेले पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे मुंबईत एका शासकीय कामासाठी गेल्यानंतर शुक्रवारी (दि.८) दिवसभर तेथेच होते. मंत्रिमंडळातील नाराजीनंतर मात्र त्यांच्या बदलीच्या चर्चेने वेग धरला असून मकरंद रानडे यांच्यासह अन्य काही नावांची चर्चा होत आहे.
नाशिक- महसूल यंत्रणेला अंगावर घेतल्यानंतर वादात सापडलेले पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे मुंबईत एका शासकीय कामासाठी गेल्यानंतर शुक्रवारी (दि.८) दिवसभर तेथेच होते. मंत्रिमंडळातील नाराजीनंतर मात्र त्यांच्या बदलीच्या चर्चेने वेग धरला असून मकरंद रानडे यांच्यासह अन्य काही नावांची चर्चा होत आहे. हेल्मेट सक्तीची पेट्रोल पंपावर अंमलबजावणी, त्यानंतर होर्डींग्ज परवानग्या, सार्वजढनिक कार्मांिधच्या परवानगीसाठी विविध कागदपत्रांची मागणी करणे अशा कारणांमुळे गेल्या काही दिवसात पोलीस आयुक्त पांडेय यांच्या भोवती वाद सुरू झाले. त्यातच महसूल यंत्रणेच्या अधिकाराविषयी त्यांनी शासनाला धाडललेल्या पत्रामुळे त्यांनी मंत्री मंडळाची देखील नाराजी ओढवून घेतली. याा वादापूर्वीच पांडेय यांनी बदलीसाठी अर्ज केल्याची देखील चर्चा आहे. त्यातच आता महसूल प्रकरणाने त्यांच्या बदलीच्या चर्चेने वेग घेतला असून नाशिकचे नवे आयुक्त म्हणून मकरंद रानडे यांच्याबराबेर अन्य काही नावांची चर्चा आहे.