हेरगिरीमुळे अटकेत असलेल्या दीपकचा जामीन नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:15 AM2020-12-06T04:15:33+5:302020-12-06T04:15:33+5:30

व्हॉट्सॲपद्वारे एका अनोळखी महिलेसोबत ओळख झाली आणि या ओळखीतून दीपक हा पाकिस्तानच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला होता. त्याने अनोळखी महिलेच्या ...

Deepak, who was arrested for spying, denied bail | हेरगिरीमुळे अटकेत असलेल्या दीपकचा जामीन नामंजूर

हेरगिरीमुळे अटकेत असलेल्या दीपकचा जामीन नामंजूर

Next

व्हॉट्सॲपद्वारे एका अनोळखी महिलेसोबत ओळख झाली आणि या ओळखीतून दीपक हा पाकिस्तानच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला होता. त्याने अनोळखी महिलेच्या सांगण्यावरून थेट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) येथील प्रतिबंधित क्षेत्राची व तेथे तयार केले जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या लढाऊ सुखोई विमानांची तसेच त्यांच्या अन्य संवेदनशील भागाची व इतर सुरक्षासंबंधित गोपनीय माहिती सोशल मीडियावरून महिलेला पुरविल्याची धक्कादायक बाब एटीएसच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आणली होती. दीपकला बेड्या ठोकल्यानंतर त्यास न्यायालयाने सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावली होती. यामुळे दीपकची रवानगी कारागृहात करण्यात आली. दरम्यान, दीपकने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यात सरकारी पक्षातर्फे दहशतवादविरोधी पथकाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला.

---इन्फो--

चाैकशीत धक्कादायक माहिती

संशयित दीपककडे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या चौकशीतून अत्यंत गंभीर स्वरूपाची धक्कादायक माहिती समोर आली. एचएएलच्या भारतीय बनावटीच्या विमानांची गोपनीय माहिती जी अत्यंत संवेदनशील आहे, ती पाकच्या गुप्तहेर संस्थेच्या हस्तकांपर्यंत पोहचविली. तसेच भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानातील मिसाईल व रॉकेटलाँचरबाबत तांत्रिक माहितीही उघड केल्याचे समोर येत आहे.

Web Title: Deepak, who was arrested for spying, denied bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.