जिल्ह्यात दीपोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 10:28 PM2019-10-25T22:28:36+5:302019-10-25T22:29:59+5:30
मालेगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दीपोत्सवाची घरोघरी तयारी पूर्ण झाली असून, आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा, असा चार दिवस हा सण सर्वत्र साजरा करण्यात येत असला तरी खºया अर्थाने गोवत्स द्वादशीला (वसूबारस) दिवाळीला सुरुवात होते. शुक्रवारी वसूबारसने दीपोत्सवाला प्रारंभ झाला.

दिवाळी तथा दीपोत्सव म्हणजेच दिव्याचा उत्सव होय. भारतीय संस्कृतीत या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. वसूबारस किंवा गोवत्स द्वादशीला दिवाळीची सुरुवात होऊन या दिवशी गोवत्स पूजनाची परंपरा पाळतात. भारतीय संस्कृतीत गायीला गोमाता मानले जाते. दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी
गाई-वासरांची पूजा करण्याची प्रथा आहे. वसूबारस हे सुवासिनींचे व्रत मानले जाते. देव-आसुरांच्या समुद्ध मंथनातून ‘नंदिनी’ या कामधेनू देवतेचा लाभ झाला. या गोमातेत तेहत्तीस कोटी देव सामावल्याचे सांगण्यात येते.
तिच्या वंशजाची पूजा केल्यास भावभावना शुद्ध होते. मनोकामना सफल होते, अशी श्रद्धा असल्याने महिला वसूबारस व्रत
करतात.
या दिवशी उपवास करून गाय-वासराला स्नान घालून सायंकाळी पूजा करण्यात येते. ‘नंदिनी माते माझे मनोरथ पूर्ण कर’ अशी प्रार्थना करण्यात येते. या दिवशी भाकरी व गवाराची भाजी करून उपवास सोडण्याची प्रथा आहे.