विहिरीत पडून हरण मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:18 AM2021-02-27T04:18:09+5:302021-02-27T04:18:09+5:30
पोलीस पाटील नितीन गायकवाड यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. शेतमालक पवार, पोलीस पाटील गायकवाड, वनसेवक कचरू आहेर, ...
पोलीस पाटील नितीन गायकवाड यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. शेतमालक पवार, पोलीस पाटील गायकवाड, वनसेवक कचरू आहेर, वनसेवक रामनाथ भोरकडे, वनमजूर नानासाहेब त्रिभुवन, शेतकरी शांताराम पवार आदींनी मृत हरणाला विहिरीतून काढून शासकीय नियमावलीनुसार शवाचे दफन केले. पिण्याच्या पाण्याच्या शोधात सदर हरीण विहिरीत पडले असावे, असा अंदाज यावेळी वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेणाऱ्या वन्यप्राण्यांचा नेहमीच बळी जात असतो. रहाडी, राजापूर, रेंडाळे, ममदापूर परिसरात वनसंवर्धन क्षेत्र असून यात हरण, काळविटांसह अन्य वन्यजीवांची मोठी संख्या आहे. दरम्यान, वन्यजीवांसाठी वनसंवर्धन क्षेत्रात पाण्याची उपलब्धता करून देण्याची मागणी परिसरातील वन्यजीव प्रेमींकडून केली जात आहे.
फोटो- २६ येवला हरीण
===Photopath===
260221\26nsk_60_26022021_13.jpg
===Caption===
फोटो- २६ येवला हरिण