हरणाचे पाडसाला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 01:15 AM2020-02-05T01:15:30+5:302020-02-05T01:16:26+5:30
येवला : पिंपळगाव जलाल शिवारामध्ये भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पाडसावर हल्ला केल्या नंतर प्रसंगावधान राखत तेथील काहींनी कुत्र्यांना हकलून देत हरणाचा बचाव केला व त्याला जीवदान दिले.
लोकमत न्युज नेटवर्क
येवला : पिंपळगाव जलाल शिवारामध्ये भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पाडसावर हल्ला केल्या नंतर प्रसंगावधान राखत तेथील काहींनी कुत्र्यांना हकलून देत हरणाचा बचाव केला व त्याला जीवदान दिले.
कपाशीच्या शेतामध्ये एकटा हरणाचे पाडस बघून कुत्र्यांनी त्याला घेराव घालुन हरणाच्या पिलाचे लोचके तोडण्यास सुरु वात केली हरणाच्या पाडसाच्या कमरेला मानेला व कानाला कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात इजा केली. प्रसंगावधान राखून पिंपळगाव जलाल येथील तरुणांनी हे पाडस कुत्र्याची शिकार होता होता वाचविले. वनविभागाचे अधिकारी प्रसाद पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी त्विरत टीमला पाठवून हरणाचे पाडस त्यांच्या ताब्यात घेतले. पिंपळगाव जलाल शिवारामध्ये 70, 80 हरणांचे मोठे टोळके आहे. जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळेस पिंपळगाव जलाल येथील जय भवानी मित्र मंडळ यांना संपर्क केल्यानंतर मंडळातील सदस्य प्राणमिात्रांसाठी धावून येतात असे प्रसाद पाटील यांनी सांगितले घटनास्थळी राजेंद्र खोकले, पुंजाहारी भोरकडे, विजय भोरकडे, महेश भोरकडे व वेंकटेश्वर आवारे यांनी सहकार्य केले.