अन्न-पाण्याच्या शोधात हरणाची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 06:44 PM2021-02-06T18:44:22+5:302021-02-06T18:46:10+5:30

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर-ममदापूर या डोंगराळ भागात सध्या पाण्याची कमतरता भासू लागल्याने हरणांना अन्न-पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

Deer roam in search of food and water | अन्न-पाण्याच्या शोधात हरणाची भटकंती

अन्न-पाण्याच्या शोधात हरणाची भटकंती

Next
ठळक मुद्देजानेवारी-फेब्रुवारीपासून तालुक्याच्या पूर्व भागाला पाणीटंचाईचा सामना

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर-ममदापूर या डोंगराळ भागात सध्या पाण्याची कमतरता भासू लागल्याने हरणांना अन्न-पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

जानेवारी-फेब्रुवारीपासून तालुक्याच्या पूर्व भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. कितीही पाऊस झाला तरी राजापूर व पूर्व भागातील असलेल्या गावांना पाणीटंचाई पाचवीला पूजलेली आहे. वन संवर्धन क्षेत्रामध्ये वाळलेले गवत आहे. परंतु हरीण, काळवीट हे हिरव्या चाऱ्यासाठी भटकंती करताना दिसून येत आहे. यामुळे हरीण मानवी वस्तीकडे अन्न पाण्याच्या शोधात फिरत आहे. तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या हरीण काळवीट यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असल्याने वन संवर्धन क्षेत्रांमध्ये हरणांना खाण्यासाठी गवती कुराण आहे. परंतु पाण्याअभावी त्यावरही गंडांतर आले आहे.
 

Web Title: Deer roam in search of food and water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.