दोन दिवसांपासून हरीण विहिरीत; ग्रामस्थांनी वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 03:33 PM2020-03-01T15:33:20+5:302020-03-01T15:33:44+5:30
साकोरा परिसरातील सारताळे शिवारातील कमलेश नथु गायकवाड यांच्याशेतामध्ये यावर्षी अगदी उन्हाळ्याच्या सुरवातीलाच दोन दिवसांपासून पाण्याच्या शोधात हरण कोरड्या विहिरीत पडले. विहीर कोरडी असल्याने ते वरती येण्यासाठी धडपड करीत असल्यामुळे त्याचे कमरेचे हाड मोडले असून, पायांना जखमा झाल्या तसेच दोन दिवसांपासून चारा- पाणी न मीळाल्याने ते अशक्त झाल्याचे वनरक्षक नाना राठोड यांनी सांगितले.
साकोरा -. साकोरा परिसरातील सारताळे शिवारातील कमलेश नथु गायकवाड यांच्याशेतामध्ये यावर्षी अगदी उन्हाळ्याच्या सुरवातीलाच दोन दिवसांपासून पाण्याच्या शोधात हरण कोरड्या विहिरीत पडले. विहीर कोरडी असल्याने ते वरती येण्यासाठी धडपड करीत असल्यामुळे त्याचे कमरेचे हाड मोडले असून, पायांना जखमा झाल्या तसेच दोन दिवसांपासून चारा- पाणी न मीळाल्याने ते अशक्त झाल्याचे वनरक्षक नाना राठोड यांनी सांगितले. विहीरीच्या वर काढल्यानंतर चालता येत नव्हते. त्याला ग्रामस्थांच्या मदतीने गूळ- पाणी पाजण्यात आले.
याच परिसरातील सतीष बोरसे बकº्या चारण्यासाठी गेला असता त्याला हरीण विहिरीत पडलेले दिसले. वन विभागाचे वनरक्षक नाना राठोड यांच्याशी संपर्क साधला व ते त्यांची टीम घेऊन घटनास्थळी हजर झाले. सारताळे येथील ग्रामस्थांच्या मदतीने हरणाला विहिरीतून वर काढण्यात आले. वनरक्षक नाना राठोड, वनसेवक नितीन कदम, भूषण घोडके ,मच्छिन्द्र वाघ ,तसेच ग्रामस्थ दादा बोरसे, बाळू बोरसे, शिवाजी बच्छाव, गोरख मोरे, सुरेश मोरे , समाधान बोरसे यांनी मदत केली. लवकरात लवकर वन विभागाने लक्ष घालून पाणवठे तयार करून वन्य प्राण्यांचे जीव वाचवणे गरजेचे असल्याचे मत असे नागरिकांचे म्हणणे आहे.