महिंद्र अँड महिंद्र कामगार संघटनेत विद्यमान पदाधिकाऱ्यांना पराभवाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:14 AM2021-02-14T04:14:52+5:302021-02-14T04:14:52+5:30

सातपूर :- येथील महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि.१३) मतदान घेण्यात आले. सर्वच विद्यमान पदाधिकारी ...

Defeat to existing office bearers in Mahindra & Mahindra Workers Union | महिंद्र अँड महिंद्र कामगार संघटनेत विद्यमान पदाधिकाऱ्यांना पराभवाचा धक्का

महिंद्र अँड महिंद्र कामगार संघटनेत विद्यमान पदाधिकाऱ्यांना पराभवाचा धक्का

Next

सातपूर :- येथील महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि.१३) मतदान घेण्यात आले. सर्वच विद्यमान पदाधिकारी पराभूत झाल्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. अध्यक्षपदी एन.डी. जाधव तर सरचिटणीसपदी संजय घोडके विजयी झालेत. आठ जागांसाठी ७४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अँड महिंद्रा कामगार संघटनेची निवडणूक घेण्यात यावी म्हणून विरोधकांनी जिल्हाधिकारी आणि न्यायालयात धाव घेतली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.त्यानुसार २०२१ ते २०२४ या कालावधीसाठी निवडणूक घेण्यात आली. आठ जागांसाठी एकूण उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात विद्यमान सात पदाधिकारी पुन्हा निवडणूक रिंगणात होते.या सर्वांना पराभव पत्करावा लागला आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. त्यानंतर मतमोजणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. यात अध्यक्षपदी एन.डी. जाधव, सरचिटणीसपदी संजय घोडके,उपाध्यक्षपदी संजय घुगे,खजिनदारपदी सचिन मोरे,चिटणीसपदी जितेंद्र सूर्यवंशी,सहचिटणीसपदी अजित मोरे,कमिटी मेंबर अ साठी प्रकाश धनगरमाळी तर कमिटी मेंबर ब साठी संतोष सावकार आदी पदाधिकारी विजयी झालेत. २३०० पैकी मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्नल चंद्रा बॅनर्जी यांनी काम पाहिले.

Web Title: Defeat to existing office bearers in Mahindra & Mahindra Workers Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.