तरुण कार्यकर्त्यांच्या उत्साहाने बंडखोरांचा पराभव शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:03 AM2019-10-12T01:03:51+5:302019-10-12T01:04:13+5:30

आपल्या देशात संसदीय लोकशाही पद्धत असल्याने निवडणुका होत असताना निवडणूक या राजकीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत वेगवेगळ्या निवडणुका होत असताना प्रत्येकवेळी प्रचाराचे वातावरण देखील वेगवेगळ्या प्रकारचे असते.

The defeat of the rebels is possible with the enthusiasm of the young workers | तरुण कार्यकर्त्यांच्या उत्साहाने बंडखोरांचा पराभव शक्य

तरुण कार्यकर्त्यांच्या उत्साहाने बंडखोरांचा पराभव शक्य

Next
ठळक मुद्देआठवणीतील निवडणूक

आपल्या देशात संसदीय लोकशाही पद्धत असल्याने निवडणुका होत असताना निवडणूक या राजकीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत वेगवेगळ्या निवडणुका होत असताना प्रत्येकवेळी प्रचाराचे वातावरण देखील वेगवेगळ्या प्रकारचे असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून अनेक उमेदवार इच्छुक असतात; परंतु संधी एकालाच मिळते. त्यामुळे अन्य इच्छुक नाराज होतात. त्यांची नाराजी दूर करताना किंवा समजूत घालताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांची धावपळ उडते. त्यातच एखाद्या निवडणुकीत एखाद्या मोठ्या राष्टÑीय पक्षाकडे कल असेल तर इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक वाढते. सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी एका निवडणुकीतील कॉँग्रेस पक्षाच्या वतीने स्व. मुरलीधर माने यांना उमेदवारी मिळाली होती. त्याचवेळी पक्षातील अन्य इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नाराजांची समजूत काढली, त्यामुळे काहींनी माने यांचा प्रचार सुरू केला; परंतु काही इच्छुकांनी मात्र उघड उघड बंडखोरी पुकारली. आतादेखील निवडणुकीमध्ये बंडखोरी होते. अनेकजण लगेच दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळवितात. त्या काळात फारसा असा प्रचार नव्हता. त्यामुळे बंडखोर उमेदवाराला अपक्ष म्हणूनच उभे राहावे लागत असे. पक्षाची उमेदवारी मिळाली नाही त्यांनी अपक्ष म्हणून प्रचार सुरू केला. त्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला; परंतु आमच्या उमेदवारीसोबत मोठ्या प्रमाणावर तरुण कार्यकर्त्यांची फळी होती. साहजिकच माने यांचा जोरदार प्रचार सुरू झाला. त्यातच कॉँग्रेस पक्षाच्या राष्टÑीय नेत्यांची सभा नाशिकमध्ये झाल्याने आम्हाला विजयाची पक्की खात्री झाली आणि घडलेही तसेच. आमचे उमेदवार निवडून आले. थोडक्यात पक्षाच्या उमेदवाराकडे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी असेल तर निवडणूक जिंकणे सहज शक्य होते.
लक्ष्मण धोत्रे

Web Title: The defeat of the rebels is possible with the enthusiasm of the young workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.