विद्यार्थिनींकडून सैनिकांना राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:07 PM2018-08-12T22:07:48+5:302018-08-12T22:09:11+5:30
मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचा सण सैनिकांसाठी साजरा करण्याचा संकल्प करुन सैनिकांना राख्या पाठविल्या आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सैनिकांसाठी राख्या पाठविण्याचे यंदा पहिलेच वर्ष आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा संकल्प शाळेतील शिक्षिका अश्विनी सोनवणे यांनी केला आहे. राखी बरोबरच सैनिकांना शुभेच्छा संदेशही पाठविण्यात आले. भारतातील श्रीनगर, राजस्थान, कच्छ, देवळाली कॅम्प येथील चार सैनिकांच्या कंपन्यांसाठी राख्या विद्यार्थ्यांनी पाठविल्या आहेत. भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी राख्या पाठविल्या आहेत. मुख्याध्यापिका रजनी निकम, आशालता हिरे, विजय पिंगळे, ममता पवार, उषा बोरसे, सुलोचना जाधव, अश्विनी कापडणीस, संजय तिसगे, ममता पवार, उषा बोरसे, सुलोचना जाधव, अश्विनी कापडणीस, संजय तिसगे, मधुकर शेवाळे यांनी हा उपक्रम राबविला आहे.