नाशकात डिफेन्स हबची सुरूवात महिनाभरात

By श्याम बागुल | Published: September 12, 2018 03:13 PM2018-09-12T15:13:26+5:302018-09-12T15:21:11+5:30

Defense hub begins in Nashik in a month | नाशकात डिफेन्स हबची सुरूवात महिनाभरात

नाशकात डिफेन्स हबची सुरूवात महिनाभरात

Next
ठळक मुद्देसुभाष भामरे : आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग सेंटरचे स्थलांतर नाही सदर केंद्र नागपूरला स्थलांतर करण्यात येत असल्याच्या चर्चा सुरू होत्या

नाशिक : संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे साहित्य निर्मिती करणारे डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकलाच होणार असून, त्याबाबतची घोषणा व अंमलबजावणीला एका महिन्यातच सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
तीन महिन्यांपूर्वी डॉ. सुभाष भामरे यांनी डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकला होणार, अशी माहिती दिली होती. त्यानंतर कार्यक्रम घेऊन अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे सदर कार्यक्रम घेता आला नाही. परिणामी मध्यंतरी सदर केंद्र नागपूरला स्थलांतर करण्यात येत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र तसा कोणताही प्रकार नसून संरक्षण मंत्रालय नाशिकला सदर इनोव्हेशन हब सुरू करण्याच्या दिशेने काम करीत आहे, असे डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.
भारतात लघुउद्योजकांना संरक्षण क्षेत्रातून प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या माध्यमातून 'डिफेन्स इको सिस्टीम' तयार व्हावी यासाठी सरकारने डिफेन्स इनोव्हेशन हब विविध ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात लघुउद्योजक, संरक्षण उद्योग, इनोव्हेटर्स, स्टार्ट अप, अकॅडमी यांना संशोधन आणि विकासासाठी प्रस्तावित करायचे व त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी सदर हब नागपूरला होत असल्याबाबत चर्चा सुरू होती. या चर्चेत काहीही तथ्य नसून एका महिन्यात डिफेन्स इनोव्हेशन हबची रितसर घोषणा होईल, असे डॉ.भामरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आर्मी कॉम्बॅक्ट एव्हिएशन ट्रेनिंग युनिट नाशिक येथून हलविण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Defense hub begins in Nashik in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.